महाराष्ट्र

एसटी दरवाढ मागे घ्या; महाविकास आघाडी आक्रमक 

राज्याच्या कानाकोपऱ्यात एसटीची सेवा उपलब्ध असून सर्वसामान्य जनतेची जीवन वाहिनी आहे.

Swapnil S

मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यात एसटीची सेवा उपलब्ध असून सर्वसामान्य जनतेची जीवन वाहिनी आहे. एसटी गाड्याची केलेली तिकिट दर वाढ तातडीने मागे घ्या आणि जनतेची लूट थांबवा, या मागणीसाठी  महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभरात सोमवारी आंदोलन करण्यात आले. 

राज्य सरकारने एसटीची दर वाढ मागे घ्यावी यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बस स्थानक येथे एसटी भाडेवाढीला विरोध करत ठिय्या मांडला.

एसटीची तिकीट दरवाढ तात्काळ मागे घ्या, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दानवे यांनी यावेळी दिला.‌

एसटी महामंडळात होणाऱ्या भ्रष्टाचाराला सरकार खतपाणी घालत आहे, यात एसटीचा तोटा होत नाही का, याचा भार गोरगरीब, सामान्य जनतेवर सरकार का लादत आहे, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

जनता हैराण

परिवहनमंत्र्यांनी भाडेवाढीचा निर्णय घेतला नसेल तर मग निर्णय कोण घेतो? हे खाते चालवतय कोण, असा प्रश्न उपस्थित करत सरकारमधील बेजबाबदारपणावर हल्ला चढवण्यात आला. परिवहनमंत्री जबाबदारी झटकतात, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा याला विरोध आहे. एसटी भाडेवाढ हा निर्णय नेमका कुणाचा आहे? सरकारच्या प्रत्येक निर्णयामागे गोंधळच दिसतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले यांनी  व्यक्त केले.

निवडणूक नको

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबत सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे. यावेळी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवले पाहिजे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० हजार जागा या ओबीसींच्या हक्काच्या आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नये, असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिला.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य