छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील पुंडलिकनगर कार्यालयासमोर शनिवारी बहुजन विकास कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर अचानक दगडफेक करण्यात आली. ही घटना दुपारी १२ च्या सुमारास घडली. घटनेनुसार, अतुल सावे हे आपल्या कार्यालयात उपस्थित असताना त्यांच्या गाडीवर एक तरुणाने दगड फेकला. दगड गाडीच्या समोरील भागावर आदळल्याने किरकोळ नुकसान झाले.
स्थानिकांनी दगड फेकणारा तरुण ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. प्राथमिक माहिती नुसार, आरोपी मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे.
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे. अतुल सावे यांचे ड्रायव्हर आणि कार्यालयातील कर्मचारी यांनी घटनास्थळी पोलिसांना तातडीने सूचित केले.
पोलीस तपासात अधिक माहिती गोळा करत आहेत आणि आरोपीबाबत योग्य ती कारवाई केली जाणार आहे.