महाराष्ट्र

गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक दादागिरी थांबवा, नाहीतर जशास तसे उत्तर -भुजबळ

मराठा आंदोलनावरही टीका केली होती. रविवारी पडळकर शेजारी सुरू असलेल्या आंदोलन स्थळाला भेट देण्याकरिता गेले असता त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली.

नवशक्ती Web Desk

इंदापूर : भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर रविवारी इंदापूर येथे चप्पल फेकण्यात आली. इंदापूर येथे शनिवारी ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी गोपीचंद पडळकर, अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. या मेळाव्यातून पडळकर आणि भुजबळांनी मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य केले होते. मराठा आंदोलनावरही टीका केली होती. रविवारी पडळकर शेजारी सुरू असलेल्या आंदोलन स्थळाला भेट देण्याकरिता गेले असता त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली.

याप्रकरणी छगन भुजबळांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, विरोध आहे तो झुंडशाहीला व दादागिरीला! आज विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांच्यावर काही समाजकंटकांनी विकृती दाखवून व लोकशाही पायदळी तुडवून हल्ला केल्याची बातमी समजली. या घटनेचा आम्ही सर्वजण तीव्र निषेध करतो. मी आजही इंदापूर येथे जाहीर सभेत सांगितले आहे की, ही दादागिरी थांबली नाही तर याला आम्ही जशास तसे उत्तर देऊ!’ छगन भुजबळांनी जहाल भाषण केले. मनोज जरांगे-पाटलांची नक्कल करत त्यांच्या भूमिकेवर टीका केली. तसेच, जरांगे-पाटलांना ग्रामपंचायतीचा सरपंच होण्याचे आव्हानही दिले.

हल्ल्यामागचे सूत्रधार आरक्षणाचे शत्रू -पडळकर

दरम्यान, या हल्ल्याबाबत गोपीचंद पडळकर म्हणाले, महाराष्ट्रातील ओबीसी समाज अत्यंत संयमाने आणि शांततेने एल्गार मेळाव्यातून आरक्षणाबाबतची भूमिका मांडत आहे. इंदापूरची सभा झाल्यानंतर, शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळावा, म्हणून जे शेतकरी उपोषणाला बसले आहेत त्यांना भेटायला जात असताना ही नौटंकी घडली. महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेल्या समाजकंटकांना आरक्षणापेक्षा महाराष्ट्रात अशांतता पसरवायची आहे. यामागचा सूत्रधार हाच मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा शत्रू आहे, असा टोलाही गोपीचंद पडळकरांनी हाणला.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या