महाराष्ट्र

सीईटी निकालानंतर प्रवेशाची प्रतीक्षा; प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू नसल्याने विद्यार्थी, पालक चिंतेत

Swapnil S

मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तब्बल १९ परीक्षा घेण्यात आल्या. यापैकी १२ सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र अद्यापही संबंधित अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने तब्बल ८ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे पालक चिंतेत आहेत.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतलेल्या विधी तीन वर्षे, एमएचटी सीईटी, बीबीए/बीबीसीए/बीएमएस, नर्सिंग, एलएलबी ३ वर्ष आदी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत, तर काही अभ्यासक्रमाचे निकाल अद्यापही जाहीर झालेले नाहीत. सर्व सीईटी परीक्षांसाठी तब्बल ११ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. १९ पैकी १२ सीईटीचे निकाल जाहीर असून जून महिना संपत आला तरी प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत.

सर्वाधिक नोंदणी असलेल्या एमएचटी सीईटीच्या निकालावर विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतल्याने २७ आणि २८ जून रोजी विद्यार्थ्यांना उत्तरतालिका सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. या उत्तरतालिकेवरील आक्षेपांची संख्या वाढल्यास, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांचा प्रवेशही लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

एकूण १९ सीईटी परीक्षा घेण्यात आल्या.

या परीक्षांसाठी १२,४६,३९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

परीक्षा ११,३३,७०० विद्यार्थ्यांनी दिली.

सीईटी व परीक्षा दिलेले विद्यार्थी

बीएडएमएड- ७७१ एमएड- २६१७ एमपीएड-२३१३

बीएड आणि बीएड इएलसीटी सीईटी- ७२,३७८

बीपीएड -६,२९३ एमबीए/एमएमएस -१,३८,६८३

एमआर्च- ८४० एमएचएमसीटी- १७९

एलएलबी ३ वर्ष - ६८,१४४ एमसीए -३८,४७९

एमएचटी सीईटी पैकी पीसीबी- २,९५,५७७

एमएचटी सीईटी पैकी पीसीएम-३,७९,८६८

बीए बीएससी बीएड-१,२८८

एम.एचएमसीटी (एकात्मिक)- १३

बी.एचएमसीटी- ८७७ डीपीएन पीएचएन सीईटी -३९०

एम.प्लॅनिंग (एकात्मिक) १०, नर्सिंग - ५०,२१७

बीसीए/बीबीए/ बीएमएस-४८,१३५

एलएलबी ५ वर्ष -२६७५४

अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश का पाळले नाहीत? निवडणूक आयोगाने मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना घेतले फैलावर

Akshay Shinde Encounter : दफनासाठी निर्जन जागा शोधा; अक्षय शिंदेप्रकरणी हायकोर्टाचे निर्देश

Mumbai Local Train Update : मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; तर पश्चिम रेल्वेचा १० तासांचा पॉवर ब्लॉक

पैकीच्या पैकी! मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर युवा सेनेचाच झेंडा; ‘अभाविप’ला धूळ चारत सर्व १० जागा जिंकल्या

'त्या' महिलेची व्यथा समजून घेऊन कारवाई करणार : देवेंद्र फडणवीस