महाराष्ट्र

तामदर्डी येथे कोल्हापूर बंधाऱ्यासाठी प्रस्ताव सादर करा - मंत्री संजय राठोड

योजनेसाठी ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या बंधाऱ्यात ५०० दशलक्ष घन मीटर इतका पाणीसाठा होणार आहे.

Swapnil S

नागपूर : मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याबाबत अंदाजपत्रक बनवण्याचे काम सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या बंधाऱ्यामुळे मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्यातील गावांना लाभ होणार असल्याची माहिती, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य समाधान अवताडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री राठोड म्हणाले की, या बंधाऱ्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी, तंडोर, सिध्दापूर, माचनुर आणि ब्रह्मपुरी तर मोहोळ तालुक्यातील आरबली, मिरी, बेगमपूर, घोडेश्वर, इनकी आणि दक्षिण सोलापूर मधील वडापुर या गावांना लाभ होणार आहे. या योजनेसाठी ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या बंधाऱ्यात ५०० दशलक्ष घन मीटर इतका पाणीसाठा होणार आहे.  यामुळे परिसरातील ५२५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Mumbai : गोरेगाव-ओशिवरा प्रवास होणार जलद; बहुप्रतिक्षित मृणालताई गोरे उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला, महापौर रितू तावडे यांच्या हस्ते उद्घाटन

सावधान! वर्तमानपत्रात पॅक केलेले समोसे-भजी खाताय? FSSAI कडून आरोग्याबाबत धोक्याचा इशारा

Mumbai : निसर्गप्रेमींसाठी पर्वणी! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जंगल सफरीची संधी; कधी आणि कसं जायचं? वाचा सविस्तर

Mumbai : ७ जूनपासून पाणीटंचाईची शक्यता; वॉटर टँकर असोसिएशनकडून बेमुदत संपाचा इशारा

एकतर्फी प्रेमाचा हैवानपणा! १७ वर्षीय मुलीवर कुऱ्हाडीचे वार, गळ्यात फास बांधून छतावर लटकवण्याचा प्रयत्न, VIDEO