महाराष्ट्र

७५ टक्के मंत्री गैरहजर, अशासकीय विधेयक आणा; भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा सभागृहात संताप

राज्यात डिसेंबर २०२४ मध्ये महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिपदाचे दावेदार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पत्ता कट करण्यात आला. मुनगंटीवार यांची मंत्रिपदी वर्णी न लागल्याने त्यावेळेपासून ते भाजपला वेळोवेळी घराचा आहेर देत आले आहेत. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून त्यातही मुनगंटीवार यांनी भाजपला टोला लगावत आपली नाराजी व्यक्त केली.

गिरीश चित्रे

मुंबई : राज्यात डिसेंबर २०२४ मध्ये महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिपदाचे दावेदार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पत्ता कट करण्यात आला. मुनगंटीवार यांची मंत्रिपदी वर्णी न लागल्याने त्यावेळेपासून ते भाजपला वेळोवेळी घराचा आहेर देत आले आहेत. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून त्यातही मुनगंटीवार यांनी भाजपला टोला लगावत आपली नाराजी व्यक्त केली. शुक्रवारी विधानसभेत महाराष्ट्र दारू बंदी अशासकीय विधेयक त्यांनी मांडले. मात्र विधेयकावर उत्तर देण्यासाठी मंत्री सभागृहात नसल्याने मुनगंटीवार चांगलेच संतापले. शाळेत असताना विद्यार्थी गैरहजर असेल तर त्याला दुसऱ्या दिवशी शिक्षा होत असे. तसेच सभागृहात ७५ टक्के मंत्री गैरहजर तर मंत्र्यांना काम करू दिले जाणार नाही, असे अशासकीय विधेयक मांडले पाहिजे, असे मत व्यक्त करत मुनगंटीवार यांनी भाजपला धारेवर धरले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मात्र अधिवेशनात कामकाज कार्यक्रम पत्रिका इंग्रजीत. मराठी, हिंदी येत नसेल तर ब्रिटन पार्लमेंटमध्ये संबंधितांना पाठवून द्या, अशी मागणी मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत केली होती. सोमवार ३० जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्या दिवसापासून मुनगंटीवार महायुतीवर निशाणा साधत असल्याचे दिसून आले.

पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला विरोधकांनी जोरदार विरोध केल्यानंतर हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याची वेळ महायुती सरकारवर आली. तोच धागा पकडून पावसाळी अधिवेशनात सुधीर मुनगंटीवार यांनी मराठीच्या मुद्द्यावरून भाजपला घरचा आहेर दिला.

भाजपच्याच मंत्र्यावर निशाणा

महाराष्ट्रात दारू बंदीसाठी आक्रमक माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अशासकीय विधेयक मांडत सार्वजनिक ठिकाणी दारू बंदी करण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र उत्तर देण्यासाठी संबंधित विभागाचे मंत्री नाही, जे मंत्री आहेत, त्यांच्याकडून उत्तराची काय अपेक्षा करणार, महाराष्ट्र दारू बंदी अशासकीय विधेयक संमत करण्यासाठी मंत्री आशिष शेलार यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घ्यायचे का, असा सवाल करत मुनगंटीवार यांनी भाजपच्याच मंत्र्यावर निशाणा साधला.

'वंदे मातरम्' चर्चेत मोदींच्या भाषणावर काँग्रेसचा हल्लाबोल; प्रियंका गांधी म्हणाल्या, “मोदी उत्तम भाषण देतात, पण...

'वंदे मातरम्' चर्चेतून राजकारण तापलं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; ‘वंदे मातरम्’वर भाजपचा दावा कशासाठी?

MPSC ची मोठी घोषणा : संयुक्त परीक्षांच्या तारखेत बदल; २१ डिसेंबरच्या मतमोजणीमुळे आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

नाशिक-मुंबई लोकलचे स्वप्न पूर्ण होणार! कसारा-मुंबई, मनमाड-कसारा मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे लाईनसाठी हिरवा कंदील

भारतातील रस्त्याला चक्क डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव; 'या' राज्याची मोठी घोषणा, भाजपकडून टीकेची झोड