सत्तेत आल्यानंतर विचारधारा बदलली काय? सावरकर यांना भारतरत्न विलंब; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

सत्तेत आल्यानंतर विचारधारा बदलली काय? सावरकर यांना भारतरत्न विलंब; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याच्या प्रस्तावाला विलंब का होत आहे, असा घरचा आहेर देत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी राज्य विधानसभेत आपल्याच सरकारला धारेवर धरले.

Swapnil S

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याच्या प्रस्तावाला विलंब का होत आहे, असा घरचा आहेर देत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी राज्य विधानसभेत आपल्याच सरकारला धारेवर धरले.

सत्तेवर आल्यानंतर पक्षाने आपली विचारधारा बदलू नये आणि या मुद्द्यावर सरकारची भूमिका बदलली असेल, तर त्यांनी ते उघडपणे सांगावे, असे मुनगंटीवार यांनी सभागृहात म्हटले. सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्यास विलंब होत असल्याबद्दल आपल्याला दुःख झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुनगंटीवार म्हणाले की, सत्तेत येणे म्हणजे आपली वैचारिक भूमिका बदलणे असा होत नाही. सत्तेत आल्यानंतर जर तुमची विचारधारा बदलली असेल, तर मी हा मुद्दा पुन्हा कधीही उपस्थित करणार नाही. परंतु तुमची कृती आणि तुम्ही ज्या विचारधारेचे पालन करण्याचा दावा करता, त्यात मेळ दिसत नाही.

मुनगंटीवार म्हणाले की, ‘सावरकरांच्या विचारधारेसाठी आयुष्य समर्पित करणारा एक कार्यकर्ता म्हणून, आमचे स्वतःचे सरकार या फाइलवर ढिम्म बसून असल्याचे पाहून मला दुःख होत आहे. यापुढे मी हा मुद्दा कधीही उपस्थित करणार नाही.’

विलंबाने सावरकर यांना छळू नका

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांच्या हातून अनन्वित छळ सहन केला. किमान आपण तरी अगदी नकळतपणे, आपल्या विलंबाने त्यांना छळायला नको. आपल्याला फक्त एक प्रस्ताव मंजूर करायचा आहे. साध्या एका फाइललाही इतका काळ रखडावे लागते का? ५ मार्च ते १० जुलै अशी दोन अधिवेशने उलटून गेली आहेत,’ असे ते म्हणाले.

उत्तर मिळण्यास १२ वर्षांचा विलंब

विधानसभेत शुक्रवारी एक हलकाफुलका क्षण पाहायला मिळाला, जेव्हा भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एका वन्यजीवाचे अनोखे उदाहरण देत उत्तर सादर करण्यास १२ वर्षे उशीर केल्याबद्दल राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. सभागृहाने या विक्रमी विलंबाची नोंद ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये करण्यासाठी अधिकृतपणे प्रयत्न करावा, असा टोला लगावताना मुनगंटीवार म्हणाले की, पाणीपुरवठा विभागाने एका दशकाहून अधिक काळ हा मुद्दा प्रलंबित ठेवून ३६७ दिवस सुप्तावस्थेत राहणाऱ्या ‘इस्टर्न पिग्मी पॉसम’ या प्राण्यालाही झोपण्याच्या बाबतीत मागे टाकले आहे. ‘किमान तुमच्या विभागामार्फत हे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’कडे तरी पाठवा. या सभागृहाच्या नावावर एक जागतिक विक्रम नोंदवला जाईल,’ अशी टिप्पणी आमदारांनी केली, ज्यावर प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सभागृहात एकच हशा पिकला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान

Mumbai : सहा धरणांच्या सुरक्षेचे ऑडिट; तज्ज्ञ समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करणार, पालिका ४५ लाख ९० हजार रुपये खर्च करणार

Mumbai : पालिकेचा 'हॅलो ए वॉर्ड' उपक्रम; व्हॉट्सअ‍ॅपवर एआय-संचलित तक्रार निवारण सेवा सुरू

'वारी'वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान