एक्स @ChitraKWagh
महाराष्ट्र

संत तुकोबांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या; देहू गावावर शोककळा

संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी देहू येथे बुधवारी सकाळी घरातच आत्महत्या केली.

Swapnil S

पिंपरी-चिंचवड : संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी देहू येथे बुधवारी सकाळी घरातच आत्महत्या केली. त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून यामुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे.

आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. येत्या २० फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता. शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे.

शिरीष महाराज मोरे यांनी नवीन घर बांधले होते. खालच्या मजल्यावर आई-वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहत होते. मंगळवारी रात्री शिरीष महाराज मोरे वरील खोलीत आराम करण्यासाठी गेले होते. सकाळी साडेआठ वाजल्यानंतरही ते खाली आले नाहीत. त्यामुळे घरातील सदस्य वरती गेले. दरवाजा वाजविला पण दार उघडले जात नव्हते. आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे दार तोडण्यात आले असता मोरे यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. दरम्यान, आर्थिक विवंचेनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले. अधिक तपास देहू रोड पोलीस करीत आहेत. दरम्यान, शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग