महाराष्ट्र

सुनिल तटकरे यांनी टोचले विरोधकांचे कान!

सुनील तटकरे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांची कोंडी करण्यासाठी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची ढाल पुढे केली.

Swapnil S

पेण : आगामी निवडणुकीसाठी लोकसभा महायुतीतील घटक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असली, तरी अनेक ठिकाणी तिन्ही पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर धुसफूस आणि कुरबुरी सुरू असल्याचे चित्र आहे. अजितदादा गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते त्यांच्याविरोधात दंड थोपटून उभे राहिले आहेत. सुनील तटकरे यांचा रायगडावरून कडेलोट करुन आम्ही आगामी लोकसभा निवडणूक जिंकू, अशी आव्हानाची भाषा भाजपचे स्थानिक नेते वापरत आहेत. भाजपच्या या नेत्यांना सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते रायगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी सुनील तटकरे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांची कोंडी करण्यासाठी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची ढाल पुढे केली. भाजपकडून गेल्या काही वर्षांमध्ये देशभरात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जाळे विस्तारण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी २०१४ च्या पूर्वीच्या परिस्थितीबद्दल बोलणार नाही. पण अमित शाह यांनी भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पक्षाला एक शिस्त लागली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये जे काही मोजके तीन-चार लोक माझ्याविरोधात सातत्याने बोलत आहेत, त्यांची नोंद भाजपकडून घेतली जाईल.

हे लोक एकप्रकारे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एनडीए विस्तारण्याच्या धोरणाला विरोध करत आहेत. त्यांना अमित शाह आणि फडणवीसांची भूमिका आवडत नसेल. त्यामुळे हे लोक माझ्याविरोधात सातत्याने बोलत आहेत. या सगळ्याची भाजप पक्षाकडून दखल घेतली जाईल, असा इशारा तटकरे यांनी दिला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी