महाराष्ट्र

नोकरीच्या शोधातून थेट कर्जाच्या खाईत; सुष्को ईव्ही स्कूटर घोटाळ्यात तरुणांची ससेहोलपट

राज्यात नोकरीच्या संधी शोधणाऱ्या हजारो तरुणांना 'सुष्को' नावाच्या कंपनीने ईव्ही स्कूटरच्या मार्केटिंगचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात तरुणांकडून कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर कर्ज काढण्यात आले असून, अनेक मोठे फायनान्स कंपन्या आणि बँकांचे कर्मचारीही यात सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Swapnil S

पुणे : राज्यात नोकरीच्या संधी शोधणाऱ्या हजारो तरुणांना 'सुष्को' नावाच्या कंपनीने ईव्ही स्कूटरच्या मार्केटिंगचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात तरुणांकडून कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर कर्ज काढण्यात आले असून, अनेक मोठे फायनान्स कंपन्या आणि बँकांचे कर्मचारीही यात सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

फसवणूक झालेल्या तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सुष्को' कंपनी सोशल मीडियावर 'घरबसल्या काम करा, दररोज ५ ते १५ हजार कमवा' अशा आकर्षक नोकरीच्या जाहिराती देत होती. रोजगार शोधणारे तरुण या जाहिरातींना बळी पडत होते. कंपनी पुण्यातील मुख्य शाखेतून ईव्ही स्कूटर मार्केटिंगची नोकरी देऊ करत होती. मार्केटिंगसाठी स्कूटर दिली जाईल, असे सांगून तरुणांकडून त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्डसह इतर महत्त्वाची कागदपत्रे घेतली जात होती. यानंतर, तरुणांना कोणतीही कल्पना नसताना, त्यांच्या नावावर एचडीएफसी बँक, फायनान्स आणि कॅशिफाय यासारख्या कंपन्यांकडून स्कूटर खरेदीसाठी लाखो रुपयांचे कर्ज काढले जात होते. सुरुवातीला काही महिने कंपन्यांनी या कर्जाचे हप्ते भरले, मात्र नंतर ते बंद केले. कंपनीने हप्ते भरणे बंद केल्यावर,पीडित तरुणांना बँकांकडून कर्ज थकल्याचे आणि ईएमआय बाऊन्स झाल्याचे मेसेज येऊ लागले. यानंतर तरुणांनी आपला सिबिल स्कोअर तपासला असता, तो मोठ्या प्रमाणावर घसरलेला आढळला. यामुळे त्यांना शिक्षण कर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज मिळणे भविष्यात अत्यंत कठीण झाले आहे.

फसवणुकीचा आकडा कोट्यवधींच्या घरात

या फसवणूकप्रकरणी सुरुवातीला स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये ५ लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे नमूद केले असले, तरी पीडितांच्या मते हा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

मोनेडो फायनान्सकडून मिळालेल्या यादीनुसार, केवळ त्यांच्या माध्यमातून १२०६ लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. मुंबई, अक्कलकोट, पाटणा येथूनही अनेक तरुण या फसवणुकीचे बळी ठरले आहेत.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण