कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्याविषयी चुकीचे आणि प्रक्षोभक वक्तव्य करणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्या अलका लांबा यांच्यावर पोलीस आणि निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि अलका लांबा यांच्यावर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने कोल्हापूरच्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना मंगळवारी हे निवेदन देण्यात आले.