संग्रहित छायाचित्र/FPJ
महाराष्ट्र

शिक्षकांचे आंदोलन स्थगित; शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन: शब्द न पाळल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीने पुकारलेले बेमुदत आंदोलन अखेर तात्पुरते स्थगित केले आहे. समितीच्या मागण्यांबाबत शिक्षण मंत्र्यांनी ठोस आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने दिलेले आश्वासन न पाळल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कृती समितीने दिला आहे.

प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे व इतर मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने २७ जून पासून आझाद मैदानात शिक्षक, मुख्याध्यापकांनी आंदोलन सुरू केले होते. कृती समितीच्या शिष्टमंडळास शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी भेटीस बोलावले. या बैठकीमध्ये अनुदानाच्या टप्पा वाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रिमंडळ बैठकीसाठी पाठविण्यात आला आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत अनुदानाचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच प्रत्येक वर्षी अनुदानाचा पुढील टप्पा वाढ मिळेल. त्याचप्रमाणे अघोषित शाळांचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.

शिक्षणमंत्री मंत्री व आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केलेल्या विनंतीनुसार कृती समितीने हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले असल्याचे समिती मुंबई अध्यक्ष संजय डावरे यांनी सांगितले. सरकारने दिलेले आश्वासन न पाळल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे. या शिष्टमंडळात खंडेराव जगदाळे, पुंडलिक रहाटे, संजय डावरे, भारत जामानिक, संजय रंगारी यांच्यासह मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था