बँक कर्मचारी हिताच्या करारावर स्वाक्षरी करताना निखिल शर्मा
महाराष्ट्र

१७ टक्के पगारवाढीच्या निर्णयाचे बँक कर्मचाऱ्यांकडून जंगी स्वागत; फटाके फोडून, पेढे वाटून केला जल्लोष

कर्मचारी हिताच्या ऐतिहासिक करार यशस्वी करण्यासाठी ऑल इंडिया बँक अधिकारी सेना महासंघाचे उपाध्यक्ष, तडफदार युवा नेतृत्व निखिल शर्मा यांना धन्यवाद देत कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

Swapnil S

प्रतिनिधी/छत्रपती संभाजीनगर : देशभरातील बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांना १७ टक्के पगारवाढीच्या निर्णयाचे ऑल इंडिया बँक अधिकारी सेनेच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले आहे. कर्मचारी हिताच्या ऐतिहासिक करार यशस्वी करण्यासाठी ऑल इंडिया बँक अधिकारी सेना महासंघाचे उपाध्यक्ष, तडफदार युवा नेतृत्व निखिल शर्मा यांना धन्यवाद देत कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

या करारावर ८ मार्च रोजी इंडियन बँक असोसिएशन, बँक कर्मचारी सेना महासंघ आणि ऑल इंडिया बँक अधिकारी सेना महासंघ यांच्यामध्ये स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, १० खासगी आणि तीन विदेशी बँकांतील ७ लाख बँक कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना या पगारवाढीचा लाभ होणार आहे.

बँक कर्मचारी अनेक दिवसांपासून पगारवाढीची मागणी करत होते. शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बँक कर्मचारी सेना महासंघ आणि ऑल इंडिया बँक अधिकारी सेना महासंघाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही मागणी पूर्ण झाली. या करारानुसार बँक कर्मचारी व अधिकारी यांना १७ टक्के पगारवाढीसह महागाई भत्ता, प्रवास भत्ता व अन्य सुविधांमध्ये वाढ केली आहे. बँक कर्मचारी सेना महासंघ तसेच ऑल इंडिया बँक अधिकारी सेना महासंघाच्या वतीने अध्यक्ष खासदार अनिल देसाई, सरचिटणीस विनोद निकम आणि उपाध्यक्ष राजेश मटकरी यांच्यासोबत महासंघाचे उपाध्यक्ष निखिल शर्मा आणि इतर पदाधिकाऱ्यांनी वेतन करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. पगारवाढीचा हा करार ऑक्टोबर २०२७ पर्यंत लागू राहील. पाच दिवसांचा आठवडा या बँक कर्मचाऱ्यांच्या मागणीलाही तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.

हॉटेल उद्योगावर मंदीचे सावट; शुल्क कमी न केल्यास ‘हॉटेल बंदचा’ व्यावसायिकांचा इशारा

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

मुंबई-गोवा महामार्गावरील नवीन सिमेंटचे रस्तेही खचले; शिवसेना ठाकरे गटाच्या पाहणी दौऱ्यात प्रशासनाची पोलखोल

सरकारी धोरणांविरोधात आंदोलनांची लाट; ठाणे-भिवंडी-पालघरमध्ये संघटनांचा एल्गार

भारतीय वंशाचे सबिह खान Apple चे नवे COO; लवकरच घेणार जेफ विल्यम्स यांची जागा