मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 
महाराष्ट्र

लाडक्या बहिणीचे पैसे आलो हो! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे जानेवारी महिन्याचे पैसे वितरित होण्यास सुरुवात

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे जानेवारी महिन्याचे पैसे शुक्रवारपासून वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. सायंकाळपासून लाखो लाभार्थ्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Swapnil S

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे जानेवारी महिन्याचे पैसे शुक्रवारपासून वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. सायंकाळपासून लाखो लाभार्थ्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

महायुती सरकारने महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये थेट जमा करणारी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. या योजनेतून अडीच कोटी महिलांना लाभ मिळाला. पुन्हा महायुती सरकार निवडून आल्यापासून ही योजना पुन्हा कधी सुरू होणार, अशी विचारणा होत होती.

तसेच महायुतीने जाहीरनाम्यात 2100 रुपये प्रति महिना देण्याचे आश्वासन दिले होते; ते कधी देणार असाही प्रश्न विचारला जात होता. अखेर, 1500 रुपयांचा हप्ता वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. 26 जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

Baramati : शारीरिक संबंधांसाठी दबाव अन् 'त्या' गोळ्यांचा डोस; MPSC करणाऱ्या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल