महाराष्ट्र

पर्यटकांना खुणावतेय जव्हारमधील हिरवळ ; मग तुम्ही करताय जव्हार वारी ?

संदीप साळवे

जव्हार : जव्हारला मुक्तहस्ताने रंगांची उधळण करीत निसर्गाने आपले सृष्टी सौंदर्य खुलविले आहे. ऐतिहासिक व निसर्गरम्य ठिकाण, मुसळधार पाऊस नजर पोहोचेपर्यंत दाट हिरवळ, थंडगार हवा, सोसाट्याचा वारा यामुळे अंग ओलेचिंब भिजून शहारे येतात हे अनुभवताना पर्यटकांना एक वेगळ्या प्रकारचं अकल्पित समाधान मिळत असते. म्हणूनच पावसाळी सहल करण्याचा बेत झाल्यास पर्यटक सर्वप्रथम जव्हार हेच नाव पसंती देत आहेत.

धबधबा म्हणजे निसर्गाच्या सौदर्याचे प्रतीक, जव्हारला धबधब्याची राजधानी असेही म्हणता येईल. मुंबई ते ठाणे शहरांपासून पासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या निसर्गनिर्मित पर्यटनस्थळ हे या भागाचे विशेष आकर्षण, या भागात पर्यटक आल्यानंतर येथील स्थानिक नाचणीची भाकरी उडदाचा भुजा आणि मिरचीचा ठेचा गावठी कोंबडा आणि या भागातील डोंगरदऱ्यांत निसर्गनिर्मित उगवत असलेली रान पालेभाज्या ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रुचकर अशी चव आणि आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असणारे सर्व घटक यामुळे या ठिकाणी पर्यटकांना भुरळ पडत चालली आहे.

मुंबई असो नाशिक असो डहाणू पालघर बोईसर अगदी गुजरात या रस्त्यावरून जव्हारकडे मार्गक्रमण करीत असताना उंच उंच टेकड्यावरून छोटे छोटे धबधबे पांढरा शुभ्र रंगात पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला या भागात उपलब्ध होत असलेले मासे खेकडे घेऊन या भागातील आदिवासी बांधव पर्यटकांना एक वेगळी अनुभूती चाखण्याची संधी देखील देत आहेत.

तालुक्यात धबधब्यावरती जाण्यासाठी पर्यटकांची विशेष ओढ असते पावसात भिजल्यानंतर गरम गरम जेवण मिळण्याची व्यवस्था आता धबधब्यापासून काही अंतरावर झाली असल्याने पर्यटकांना आपला आनंद लुटण्यासाठी एक वेगळा वाव या तालुक्यात तयार करण्यात आला आहे.

हिरडपाडा धबधबा-

जव्हार शहरापासून सुमारे १३ कि.मी. अंतरावर असणाऱ्या हिरडपाडा गावात असणारा धबधबा खूप मोठा व उंचीवरून कोसळणारा धबधबा आहे. हा धबधबा जास्त प्रचलित नसल्यामुळे धबधब्या पर्यंत जायला पुरेशी चांगली अशी व्यवस्था नाही. मात्र थोडी पायपीट केली तर नयनरम्य असा हिरडपाडा धबधबा आपणाला पाहायला मिळतो. हा धबधबा लेंडी नदी वरून पडतो, वर्षा सहली करिता हे एक उत्तम ठिकाण आहे.

काळमांडवी धबधबा-

जव्हार शहरापासून 5 किमी  अंतरावर असणाऱ्या केळीचा पाडा या गावातून 3 किमी अंतरावर आत गेल्यावर आपणास 'काळमांडवी धबधब्याचे दर्शन होते, काळशेती नदीवरून धबधबा पडत असल्याने या धबधब्याचे नाव 'काळमांडवी' असे पडले आहे. अतिशय सुंदर अशी निसर्गाची कलाकृती बघायला पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. पर्यटक पाण्यात उतरून एन्जॉय करतात. पावसाळ्यात मातीचा रस्ता असल्याने सरकता होतो व गावातच वाहने पार्क करून त्या पर्यटन ठिकाणी पोहचावे लागत आहे.

दाभोसा धबधबा-

जव्हार तालुक्यापासून १७ कि.मी. अंतरावर असलेले नैसर्गिक पर्यटनस्थळ म्हणजे दाभोसा धबधबा...  या धबधब्यावर पर्यटकांची झुंबड उडाली असून अनेक पर्यटक नैसर्गिक धबधब्यावर ठाणे, गुजरात, नाशिक, सेलवास, वाडा, विक्रमगड, या ठिकाणाहून डोंगरदरीतील नैसर्गिक धबधबा पाहायला मिळत आहे. त्याचा आनंद घेतांना सुट्टीच्या दिवशी शनिवार, रविवार मोठी गर्दी होतांना दिसत आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल