महाराष्ट्र

राज्यातील आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर! औषधांअभावी नांदेडमध्ये २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू ; शासकीय रुग्णलायातील धक्कादायक प्रकार

राज्यातील आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर! औषधांअभावी नांदेडमध्ये २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू ; शासकीय रुग्णलायातील धक्कादायक प्रकार

नवशक्ती Web Desk

नांदेडमध्ये एका धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या डॉ. शकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मृत रुग्णांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश आहे. रुग्णांना वेळेत औषधी न मिळाल्याने जीन गमवावा लागण्याची वेळ आली आहे. गेल्या २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

राज्यातील आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. 'हाफकिन' ने औषधी खरेदी करु न दिल्याने गोरगरिबांचा मोठा आधार असलेल्या शासकीय रुग्णालयांना औषधींचा पुरवठाच करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यभरातील रुग्णालयात सध्या औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयाची दररोजची ओपीडी साधारणत: दोन हजारांवर आहे. या रुग्णालयात नांदेडसह, हिंगोली, यवतमाळ, परभणी, वाशिम आणि शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण येतात. रुग्णसंख्या वाढत असताना औषधींच्या तुटवड्याचा विषय देखील गंभीर होत चालला आहे.

या रुग्णालयात आजही बाहेरून औषधी आणण्याचा सल्ला दिला जातो. त्यात गेल्या २४ तासांत रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यू झाला अशून त्यात ६ पुरुष आणि ६ स्त्रीजातीच्या नवजात बालकांचा समावेश आहे. परंतु रुग्णालय प्रशासन मात्र अत्यवस्थ असलेल्या अन शेवटच्या क्षणी रेफर रुग्णांचा मयतामध्ये समावेश असल्याचा दावा करीत आहे.

Mumbai : सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ मोठा अपघात; लोकलच्या धडकेत २ महिलांचा मृत्यू, २ जण जखमी

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन; कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल, १ तास लोकलसेवा विस्कळीत

ऑनलाइन बेटिंग प्रकरण : शिखर धवन आणि सुरेश रैनाला ED चा दणका; ११.१४ कोटींची मालमत्ता जप्त

बुलढाणा हादरले! दारूच्या नशेत मुलाने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; नंतर स्वतःलाही संपवलं

Pune : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; दोन अधिकाऱ्यांचे निलंबन, चौकशी समितीची स्थापना