महाराष्ट्र

धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर! कृती समितीने उधळला मंत्री विखे पाटलांवर भंडारा

नवशक्ती Web Desk

राज्यभरात मराठा समाज आरक्षणासाठी(Maratha Reservation) आक्रमच झाला असताना आता धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील पुन्हा जोर धरु लागला आहे. सोलापुरात धनगर आरक्षण कृती समितीने (Dhangar Reservation Action Committee) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे. गेली कित्येक वर्ष धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) प्रश्न प्रलंबीत असल्याने धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्यांनी भंडारा उधळल्याचं सांगण्यात येत आहे. सोलापूर(Solapur) शासकीय विश्राम गृहात ही घटना घडली आह

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवसांच्या सोलापूर दोऱ्यावर आले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून ते विश्राम गृह येथेत थांबले होते. अशात अनेक लोक त्यांची भेट घेण्यासाठी येत होते. आपले प्रश्न मांडत होते. विखे पाटील देखील लोकांची निवेदन स्विकारत होते. अशात धनगर आरक्षण कृती समितीच्या काही सदस्यांनी गेली कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या धनगर आरक्षणासंदर्भातील निवेदन देण्याची विनंती केली. हे निवेदन राधाकृष्ण विखे पाटील स्विकारत असताना एका कार्यकर्त्यांने अचानक खिशातून भंडारा काढला आणि तो विखेंच्या अंगावर उधळला. यावेळी सुरक्षा रक्षकांसह उपस्थितांनी या कार्यकर्त्याला अडवत त्याला मारहाण केली. पोलिसांनी या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं असून त्यांना सदर बाजार पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.

तर मुख्यमंत्री मंत्री यांना काळं फासू

गेली कित्येक वर्ष धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. सरकार केवळ घोषणाच देत असून कोणतीही कृती होताना दिसत नाही, असा आरोप धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांचा आहे. यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं. आमच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत तर येत्या काळात मुख्यमंत्री, मंत्री यांना काळ फासायला धनगर समाज मागे पुढे बघणार नाही, असा इशारा देखील यावेळी उपस्थित कार्यकर्त्याकडून देण्यात आला आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस