मुंबई : दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप असे ६ राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरण बदलू शकते. त्यासाठी गणिताची जुळवाजुळव करावी लागते, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत. वळसे-पाटील यांच्या या वक्तव्यामुळे निकालानंतर राजकारणात नवीन ट्विस्ट येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप असे सहा प्रमुख पक्ष उतरले आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी मोठे विधान केले आहे. राज्यात सहा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून निकालानंतर राजकीय समीकरण बदलू शकते, असे संकेत वळसे-पाटील यांनी दिले आहेत. दरम्यान, वळसे-पाटील यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.