महाराष्ट्र

धुवाधार पावसात आठ प्रवाशांसह स्कॉर्पिओ गेली वाहून

तिघांचे मृतदेह सापडले असून बुडालेल्या इतर प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

वृत्तसंस्था

नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील केळवद येथील बामनमारी येथे धुवाधार पावसात एक स्कॉर्पिओ वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. वाहून गेलेल्या स्कॉर्पिओमध्ये आठ प्रवासी होते. त्यापैकी तिघांचे मृतदेह सापडले असून बुडालेल्या इतर प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. सापडलेल्या मृतदेहांमध्ये एक महिला, एक पुरूष व एका लहान मुलाचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून याच पावसामुळे बामनमारी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात गाडी चालकाने पुलावरून पाणी वाहत असतानादेखील गाडी घालण्याचे धाडस दाखवले. त्याचवेळी पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने गाडी नदीत वाहून गेल्याचे सांगितले जाते.

Maharastra Rain: मुसळधार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

लडाख आंदोलनाला हिंसक वळण; भाजपचा कॉँग्रेसवर कटाचा आरोप

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून

मुंब्रा-कळवा भागात पाणीटंचाई; पाणीटंचाईबाबत महापालिका मुख्यालयावर धडक; जितेंद्र आव्हाडांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब