पार्किंगची जागा खरेदी अथवा भाड्याने घ्या; वाहन खरेदी करताना पार्किंगच्या जागेची माहिती देणे आवश्यक करण्याचा सरकारचा विचार 
महाराष्ट्र

...तर गाडी खरेदीचा विचार करा; सरकार नवीन नियम आणण्याच्या तयारीत

पार्किंगची व्यवस्था नसेल तरी मुंबईकरांना वाहन खरेदी करता येणार आहे. त्यासाठी त्यांना पार्किंगची खरेदी करावी लागणार आहे किंवा मुंबई महापालिकेकडून पार्किंगची जागा भाड्याने घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली.

Swapnil S

मुंबई : राज्यातील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी वाहन खरेदी करताना पार्किंगच्या जागेची माहिती देणे आवश्यक असल्याचे धोरण राबवण्याच्या विचारात सरकार आहे. मात्र असे असले तरी पार्किंगची व्यवस्था नसेल तरी मुंबईकरांना वाहन खरेदी करता येणार आहे. त्यासाठी त्यांना पार्किंगची खरेदी करावी लागणार आहे किंवा मुंबई महापालिकेकडून पार्किंगची जागा भाड्याने घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईत वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर होते. ही वाहतूककोंडी कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकार या उपाययोजनांचा विचार करत आहे. आम्ही मुंबईत अनेक सार्वजनिक पार्किंग जागा तयार केल्या आहेत आणि आता एका अॅपद्वारे त्या उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे जर तुमच्याकडे पार्किंगची जागा नसेल तर तुम्ही पार्किंगची खरेदी करू शकता किंवा मुंबई महापालिकेकडून पार्किंगची जागा भाड्याने घेऊ शकता. पण पार्किंगच्या जागेशिवाय कार खरेदी करणे आणि ती रस्त्यावर पार्क करणे हे शक्य होणार नाही.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक