महाराष्ट्र

"अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे करुन तातडीने मदत देणार", राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतले 'हे' आठ महत्वाचे निर्णय

नवशक्ती Web Desk

गेल्या ३-४ दिवसात राज्यातील अनेक जिल्हात अवकाळी पाऊस झाला. यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या घास हिरावला गेला. अनेक ठिकाणी पावसासोबत वादळी वारा तसंच गारपीट देखील झाली. यावर राज्य सरकारने तातडीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती होती.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल गेलेले निर्णय

  • अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार

  • झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात

  • राज्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान. शाळांचं मुल्यांकन करणार

  • पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा आणि मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार

  • मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ शासन हमी वाढवण्यात आलेली आहे

  • औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुधारित सेवानिवृत्तीवेतन

  • 'महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना -२०२३' राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार

  • शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा

असे अनेक महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. राज्यात अवकाळीने थैमान घातलेलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तेलंगणात प्रचारासाठी गेले असल्याने राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली होती. तसंच इतर विरोधी पक्षांकडून देखील मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं गेलं होते.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत