महाराष्ट्र

ही पत्रकार परिषद संजय राऊत यांनी सेव्ह करावी...अन्यथा ; नितेश राणेंचा इशारा

संजय राऊत सारखी माणसे बाजारात विकत घेतली जातात, चोर बाजारात अगदी स्वस्तात मिळतात. त्यांना कोणीही विकत घेऊ शकतो

नवशक्ती Web Desk

भाजप नेते नितेश राणे यांनी आज ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना थेट इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी भाजप नेत्यांविरोधात वक्तव्ये करणे बंद करावे अन्यथा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडून टाकू, असे नितेश राणे म्हणाले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांना इशारा दिला आहे. मी इशारा दिला नाही, असे होऊ नये म्हणून ही पत्रकार परिषद संजय राऊत यांनी सेव्ह करावी, असेही नितेश राणे म्हणाले.

नितेश राणे म्हणाले की, "संजय राऊत यांनी माझी पत्रकार परिषद ऐकून ती सेव्ह करावी, कारण नंतर ते म्हणतील की नितेश राणे यांनी मला इशारा दिला नाही, त्यांनी मला सांगितले नाही की ते माझा एवढा अनादर करणार आहेत. संजय राऊत यांनी सांगितले पाहिजे. लक्षात ठेवा आमच्या नेत्यांवर खोटे आरोप केले, अपशब्द वापरले तर आम्ही मूळ शिवसैनिक आहोत. संजय राऊत सारखे चायनीज मॉडेल नाही.

“संजय राऊत सारखी माणसे बाजारात विकत घेतली जातात, चोर बाजारात अगदी स्वस्तात मिळतात. त्यांना कोणीही विकत घेऊ शकतो. असेही नितेश राणे म्हणाले. तुम्‍हाला वाटेल की ईडी, सीबीआय तपास बंद करतात तेव्‍हा भाजपशी संबंध येतो. पुरावे असल्यास मीडियासमोर धावण्याची गरज नाही. न्यायालय आहे. कोर्टात जा, कोणी रोखले? आम्ही हात बांधलेले नाहीत, असे नितेश राणे म्हणाले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी