त्रिभाषा धोरण समितीला एक महिन्याची मुदतवाढ 
महाराष्ट्र

त्रिभाषा धोरण समितीला एक महिन्याची मुदतवाढ

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी गठित केलेल्या समितील पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार समितीला अंतिम अहवाल ४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सरकारला सादर करावा लागणार आहे.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी गठित केलेल्या समितील पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार समितीला अंतिम अहवाल ४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सरकारला सादर करावा लागणार आहे.

राज्यात त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणी कशी करावी यासाठी ३० जून २०२५ रोजी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीने राज्यातील आठ वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष दौरे करून राजकीय नेते, शिक्षणतज्ज्ञ, संस्था प्रतिनिधी आणि पालक-शिक्षक संघटनांची मते जाणून घेतली आहेत. यापूर्वी समितीची अहवाल सादर करण्याची मुदत ४ डिसेंबर रोजी संपुष्टात आली होती. समितीच्या विनंतीनुसार ५ डिसेंबरपासून एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, विविध स्तरांतून प्राप्त झालेली मते, प्रश्नावली आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण करण्याचे काम अद्याप सुरू आहे. कामाची व्याप्ती पाहता समितीने पुन्हा एक महिन्याची मुदतवाढची विनंती केली होती.

Republic Day 2026 : कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या ‘गणेशोत्सव’ चित्ररथाची मोहिनी; संस्कृती, परंपरा आणि स्वावलंबनाचे दर्शन, Video व्हायरल

Republic Day 2026 : कर्तव्य पथावर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पराक्रमाचं दर्शन; लढाऊ विमानांची दिमाखदार परेड, पाहा Video

Republic Day 2026 : शिवाजी पार्क ते बीएमसी मुख्यालय; मुंबईत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, Video

Mumbai : परळ आगाराच्या विश्रांतीगृहात आढळल्या दारूच्या बाटल्या; बस आगाराची स्वतंत्र विभागीय चौकशी

मीरा-भाईंदर पालिकेच्या महापौर व उपमहापौरांची ३ फेब्रुवारीला निवड