महाराष्ट्र

गुढीपाडव्यानिमित्त वाहन खरेदीला मुहूर्त; वार्षिक तुलनेत ३० टक्के झाली वाढ, सर्वाधिक खरेदी कुठे?

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्याने या दिवशी सोने खरेदी, वाहन खरेदी, वास्तू प्रवेश करण्याची परंपरा आहे.

Swapnil S

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्याने या दिवशी सोने खरेदी, वाहन खरेदी, वास्तू प्रवेश करण्याची परंपरा आहे. गुढीपाडव्यानिमित्त राज्यात वाहन खरेदीला पसंती देण्यात आली असून राज्यात तब्बल ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी झाली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक वाहन खरेदी पुणे, पिंपरी चिंचवड भागात झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३० टक्के वाहन खरेदी अधिक झाली आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक नागरिक नवीन वाहनांची खरेदी करीत असतात. या वाहनांची नोंदणी संबंधित प्रादेशिक परिवहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत करण्यात येते. नागरिकांमध्ये वाहन खरेदीचा उत्साह दिसून येत असल्यामुळे यावर्षी वाहन नोंदणीमध्ये ३० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तब्बल २० हजार ०५७ वाहने मागील वर्षाच्या तुलनेत अधिक खरेदी करण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

चारचाकी कार प्रकारात २०२५ मध्ये २२ हजार ०८१ वाहनांची नोंदणी करण्यात आली असून ही मागील वर्षीच्या तुलनेत ४ हजार ९४२ ने जास्त आहे. याची टक्केवारी २८.८४ टक्के आहे. तसेच मोटारसायकल, स्कूटर या दुचाकी वाहन प्रकारात २०२५ मध्ये ५१ हजार ७५६ नवीन वाहनांची खरेदी नागरिकांकडून करण्यात आली आहे. मागील वर्षी हीच खरेदी ४० हजार ६७५ एवढी होती. यामध्येही ११ हजार ०८१ ने वाढ नोंदविण्यात आली.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

कर्जमाफीवरून गदारोळ; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत विरोधक आक्रमक

भारतावर कमी आयात शुल्क लादण्याचे ट्रम्प यांचे संकेत

GST त दिलासा; १२ टक्क्यांचा स्लॅब हटवण्याच्या हालचाली सुरू

शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन; राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल