महाराष्ट्र

कोयना धरणात ३४.९९ टीएमसी पाणीसाठा, महाबळेश्वर येथील वेण्णा तलाव 'ओव्हरफ्लो'

Swapnil S

कराड : पाटण तालुक्यातील कोयना धरणांतर्गत येणाऱ्या कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून शनिवारी दिवसभर कधी संततधार तर कधी उघडीप त्यामुळे धरण परिसरात दिवसभर पावसाचा उघडझापीचा खेळ सुरू होता. धरणात सध्या ३४.९९ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला आहे तर २९.८७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणात सध्या सरासरी १३,२४० क्युसेक्स पाण्याची आवक होत असून पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्यापही तब्बल ७०.२६ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.

चोवीस तासात धरणाच्या पाणीसाठ्यात १.१५ टीएमसीने तर पाणी पातळीत दोन फूटांनी वाढ झाली आहे. सध्या धरणातील पाणी पातळी २०८५.६ फूट म्हणजेच ६३५.६६० मीटर इतकी आहे. शुक्रवार संध्याकाळी पाच ते शनिवार संध्याकाळी पाच या चोवीस तासात व आजपर्यंतचा एकूण पाऊस असा : कोयना ६२ मिलिमीटर (१६९७), नवजा ८२ मिलिमीटर (१९१२) तर महाबळेश्वर मिलिमीटर ७८ (१५४७) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या एकूण ३३.२४ टक्के पाणीसाठा झाला आहे.

कराड : महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने तेथील वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. गुरुवारी सायंकाळनंतर त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे ते 'ओव्हरफ्लो' झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही गिरिस्थानांतील शहरवासीयांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. महाबळेश्वर येथे शनिवारी ५५ इंच पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरमध्ये एक जून ते एक जुलै या एकाच महिन्यात ८७०.६० मिलिमीटर (३४.२७ इंच) पावसाची नोंद झाली होती. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने जोर धरला. कोसळणाऱ्या पावसामुळे वेण्णा तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. याच वेण्णा तलावामधून महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणीपुरवठा केला जातो.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था