महाराष्ट्र

कोकणी भाविकांना ‘टोलमाफी’; २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर कालावधी

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यासाठी “गणेशोत्सव २०२५-कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार आहेत. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत...

Swapnil S

मुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यासाठी “गणेशोत्सव २०२५-कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार आहेत. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारितील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे.

यासाठी “गणेशोत्सव २०२५-कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार आहेत. त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठीदेखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत.

शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने पास वाटपात समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच यासंदर्भात जाहिरात व सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अमरावतीत मोठी कारवाई! लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयाजच्या घरावर बुलडोझर; अनधिकृत बांधकाम पाडले, VIDEO

Navi Mumbai : हापूस आंबा झाला स्वस्त; APMCमध्ये दरात घट, १५००रुपयांपासून पेटी उपलब्ध

चहाच्या टपरीवर रेल्वे कर्मचारी कोसळला; ३ मिनिटे तडफडल्यानंतर मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी

Mumbai : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबादेवी मंदिरात आंबा महोत्सव; भक्तांसाठी खास सोहळा