महाराष्ट्र

माथेरान 'मिनी ट्रेन'च्या फेऱ्या घटल्याने पर्यटक नाराज; 'मोटारकार' सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

निसर्गसौंदर्याने नटलेले आणि वाहनमुक्त पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या माथेरान येथील मिनी ट्रेन आजही पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे.नेरळ-माथेरान दरम्यानच्या रेल्वे सेवांमध्ये झालेली कपात आणि प्रवासाचा वाढलेला कालावधी यामुळे पर्यटकांसह स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Swapnil S

चंद्रकांत सुतार/माथेरान

निसर्गसौंदर्याने नटलेले आणि वाहनमुक्त पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या माथेरान येथील मिनी ट्रेन आजही पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे.नेरळ-माथेरान दरम्यानच्या रेल्वे सेवांमध्ये झालेली कपात आणि प्रवासाचा वाढलेला कालावधी यामुळे पर्यटकांसह स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पूर्वी नेरळ-माथेरान मार्गावर दररोज पाच फेऱ्या धावत असत. सध्या ही सेवा केवळ दोन फेऱ्यांवर मर्यादित झाली आहे. २६ जुलैच्या महापुरात रेल्वे ट्रॅकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. दुरुस्तीवर मोठा खर्च करण्यात आला; मात्र सेवा वाढवण्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

पर्यटनवाढीस चालना मिळेल

मोटारकार सेवा पुन्हा सुरू केल्यास प्रवासाचा कालावधी दीड तासांच्या आत आणणे शक्य होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे पर्यटकांना जलद, सुरक्षित आणि वेगळा अनुभव मिळू शकतो. तसेच मिनी ट्रेनच्या तुलनेत कमी मनुष्यबळ लागल्याने रेल्वे प्रशासनाचा खर्चही कमी होण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, मोटारकार सेवेसाठी थोडा अधिक दर आकारला तरी पर्यटक तयार आहेत. त्यामुळे ही सेवा पर्यटनवाढीस चालना देणारी ठरू शकते. रेल्वे प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन नवी योजना राबवावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

पर्यटक-व्हीआयपींसाठी आकर्षण सेवा

सध्या मिनी ट्रेनचा प्रवास अडीच ते तीन तासांचा होत असून पूर्वी हा प्रवास सुमारे दोन तासांत पूर्ण होत होता. त्यामुळे सुरुवातीला आकर्षक वाटणारा हा प्रवास पुढे जाऊन कंटाळवाणा ठरत असल्याच्या प्रतिक्रिया पर्यटकांकडून मिळत आहेत. अनेक पर्यटक एकदाच अनुभव घेतल्यानंतर पुन्हा ट्रेनने प्रवास टाळत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर कालका-शिमला रेल्वेप्रमाणे ‘मोटारकार’ सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. सुमारे ४० वर्षांपूर्वी नेरळ-माथेरान मार्गावर मोटारकार सेवा उपलब्ध होती. या कारमध्ये १० ते १५ प्रवासी आरामात प्रवास करू शकत आणि कमी वेळात घाटमाथ्यावर पोहोचत असत. विशेषतः पर्यटक आणि व्हीआयपींसाठी ही सेवा आकर्षण ठरत होती.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग