एक्स @airnews_nagpur
महाराष्ट्र

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचे वेळापत्रक तयार करा; मंत्री डॉ. अशोक वुईके यांचे निर्देश

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (टीआरटीआय) विविध स्पर्धा परीक्षांसाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड तसेच प्रशिक्षण संस्था निवड प्रक्रिया राबविण्यासाठी वेळापत्रक तयार करावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

Swapnil S

मुंबई : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (टीआरटीआय) विविध स्पर्धा परीक्षांसाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड तसेच प्रशिक्षण संस्था निवड प्रक्रिया राबविण्यासाठी वेळापत्रक तयार करावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

मंत्रालयात मंत्री डॉ. वुईके यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त समीर कुर्तकोटी यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ. वुईके म्हणाले की, प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षण संस्थांची विशेष पथकाद्वारे कार्यक्षमता व गुणवत्ता तपासणी करण्यात यावी. प्रशिक्षण अभ्यासक्रमात आवश्यक बदल करून नवीन कोर्सेसचा समावेश करावा. तसेच पेसा क्षेत्रातील सरपंच, उपसरपंच व आदिवासी सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत.

आदिवासी समाजाच्या लोककला, बोलीभाषा, संस्कृती व परंपरांचे दृकश्राव्य माध्यमातून संकलन करण्यात यावे. तसेच क्रांतिकारकांची चरित्रे बोलीभाषेत साहित्य स्वरूपात तयार करावीत. याचबरोबर धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत गावांचे आराखडे तयार करावे यासाठीचा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२