महाराष्ट्र

एल्गार प्रकरणातील दोन आरोपींना जामीन मंजूर

एल्गार परिषद-माओवादी लागेबांधेप्रकरणी अटक करण्यात आलेले संशोधक रोना विल्सन आणि कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Swapnil S

मुंबई : एल्गार परिषद-माओवादी लागेबांधेप्रकरणी अटक करण्यात आलेले संशोधक रोना विल्सन आणि कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. विल्सन आणि ढवळे हे २०१८ पासून कारागृहात असून याप्रकरणी सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

या दोघांनी सहा वर्षांहून अधिक काळ कच्चे कैदी म्हणून कारागृहात काढला आहे, असे न्या. ए. एस. गडकरी आणि न्या.कमल खाता यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. सदर दोघे जण २०१८ पासून कारागृहात असून त्यांच्यावर अद्याप आरोपही ठेवण्यात आलेले नाहीत. सरकारी पक्षाने ३०० हून अधिक साक्षीदार असल्याचे म्हटले आहे त्यामुळे नजीकच्या भविष्यात सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.आरोप दाखल करण्यात आल्यानंतर सुनावणी सुरू होणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी ‘एनआयए’ने केली नाही. विल्सन आणि ढवळे यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची हमी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.granted bail

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य