छायाचित्र सौजन्य - एक्स (@IaSouthern)
महाराष्ट्र

नाशिकमध्ये सरावादरम्यान तोफगोळ्याचा स्फोट; दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू

नाशिकच्या देवळाली कँम्प येथील आर्टिलरी सेंटरमध्ये तोफगोळा डागण्याच्या सरावाच्या वेळी दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू...

Swapnil S

नाशिक : नाशिकच्या देवळाली कँम्प येथील आर्टिलरी सेंटरमध्ये तोफगोळा डागण्याच्या सरावाच्या वेळी दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आर्टिलरी सेंटरमध्ये गुरुवारी तोफगोळा तोफेत भरत असताना त्याचा स्फोट झाला. यात अग्निवीर गोहिल विश्वराज सिंह (२०) व सैफत शित (२१) यांचा मृत्यू झाला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अग्निवीरांचे पथक तोफगोळा डागण्याचा सराव करत होते. तेव्हा एका तोफगोळ्याचा स्फोट झाला. यात दोन अग्निवीर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने एम. एच. रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरानी त्या दोघांना मृत घोषित केले. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

या अग्निवीरांना शहिदांचा दर्जा द्यावा - सुप्रिया सुळे

या अग्निवीराना शहिदांचा दर्जा मिळायला हवा, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

आता 'नाईन्टी'चा फॉर्म्युला! मविआचे तिन्ही प्रमुख पक्ष ८५ नव्हे, प्रत्येकी ९० जागा लढवणार

पूर्व लडाखमधून भारत-चीन सैन्याची माघार सुरू; वेगवेगळ्या दिवशी गस्त घालण्याचा दोन देशांचा निर्णय

ज्ञानवापीच्या अतिरिक्त सर्वेक्षणाची हिंदू पक्षकारांची मागणी फेटाळली; उच्च न्यायालयात दाद मागणार

राष्ट्रवादी अजित पवार गटात 'आयारामां'ची चलती; सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

महायुतीचे २७७ जागांवर ठरले; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची माहिती