महाराष्ट्र

भाजपच्या दोन फायरब्रँड महिला नेत्यांचा पराभव

यंदा लोकसभा निवडणुकीत देशात काही ठिकाणी धक्कादायक निकाल दिसून आले.

Swapnil S

नवी दिल्ली : यंदा लोकसभा निवडणुकीत देशात काही ठिकाणी धक्कादायक निकाल दिसून आले. भाजपचे चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री कपिल पाटील, मंत्री भारती पवार आदी दिग्गज नेत्यांचा पराभव झाला तर उज्ज्वल निकमही पराभूत झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भाजपच्या दोन फायरब्रँड महिला नेत्यांचा पराभव झाला. त्यातील दोघीजणी म्हणजे नवनीत राणा व माधवी लता या आहेत.

हैदराबादमध्ये एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सुरुवातीपासूनच तेलंगणातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून मोठी आघाडी घेतली. सायंकाळीपर्यंत असदुद्दीन औवेसी यांनी तीन लाखांपेक्षा जास्त आघाडी घेतली होती. त्यामुळे, येथील भाजपच्या फायरब्रँड उमेदवार माधवी लता याही पराभवाच्या छायेत होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माधवी लता यांचे कौतुक केले होते. तर, नवनीत राणा यांनीही त्यांच्या प्रचारासाठी सभा घेऊन माधवी लता यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. मात्र, भाजपच्या दोन्ही महिला नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले आहेत. त्यामुळे, निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नवनीत राणा यांना पराभवाचा फटका बसला आहे. निवडणूक प्रचारात माधवी लता यांचीही प्रतिमा हिंदू शेरनी म्हणून दाखवण्यात आली होती. खासदार नवनीत राणा यांनीही त्यांच्यासाठी हैदराबादमध्ये प्रचार केला. त्यावेळी, औवेसींवर हल्लाबोल करताना त्यांनी हिंदू व जय श्रीरामच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला होता. मात्र, जनतेने भाजपच्या या दोन्ही उमेदवारांना नाकारलं आहे. माधवी लता यांचा हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून आणि नवनीत राणा यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी