व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट 
महाराष्ट्र

नागपूरमध्ये स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

स्फोटाचे मुख्य कारण अद्याप स्पष्ट झाले नसून जखमी कामगारांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि गावकऱ्यांनी कंपनीच्या प्रवेशद्वाराकडे मोठी गर्दी केली होती.

Swapnil S

नागपूर : नागपूरमधील कळमेश्वर तालुक्यातील बीत्तलवाडी परिसरात असलेल्या एका स्फोटकांच्या कारखान्यात रविवारी दुपारी झालेल्या स्फोटात दोन कामगार ठार झाले असून तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

भुरा लक्ष्मण रजत (२५), मुनीम मडावी (२९) अशी मृतांची तर सौरभ लक्ष्मण मुसळे (२५), घनश्याम लोखंडे (३५) आणि शिफान शेख (२५) अशी गंभीर जखमी कामगारांची नावे आहेत. स्फोटाचे मुख्य कारण अद्याप स्पष्ट झाले नसून जखमी कामगारांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि गावकऱ्यांनी कंपनीच्या प्रवेशद्वाराकडे मोठी गर्दी केली होती.

‘एशियन फायर वर्क्स’ कंपनीत स्फोटामुळे लागलेल्या आगीत सर्व सामान खाक झाले. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. रुग्णवाहिकांद्वारे गंभीर जखमींना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

या कंपनीत एकूण ५० कामगार काम करतात. एका युनिटमध्ये सात कामगार कार्यरत होते. मात्र, लंचटाइम असल्याने दोघे जेवण करण्यासाठी घरी गेले होते, तर एक जण बाहेर गेला होता. युनिटजवळ पाच कामगार असताना स्फोट झाला आणि त्यात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले.

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलन साधेपणाने; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साहित्य महामंडळाची संवेदनशील भूमिका

पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करा; केंद्र, निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांची छपाई अस्पष्ट, दर्जाहीन

गोध्रा जळीतकांड प्रकरणातील दोषीची जन्मठेप स्थगित

Mumbai : गुरुवारी, शुक्रवारी पाणीबाणी; धारावी, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, भांडुपमध्ये पाणी नाही