Photo : X (@SP_GADCHIROLI)
महाराष्ट्र

गडचिरोलीतील चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार

एटापल्ली तालुक्यातील गट्टा जांबिया पोस्ट हद्दीतील मोडस्के जंगल परिसरात बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या. पोलिसांनी घटनास्थळावरून एके-४७ रायफल, एक अत्याधुनिक पिस्तूल, जिवंत दारूगोळा आणि मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी साहित्य जप्त केले. चकमकस्थळी शोधमोहीम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

Swapnil S

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील गट्टा जांबिया पोस्ट हद्दीतील मोडस्के जंगल परिसरात बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या. पोलिसांनी घटनास्थळावरून एके-४७ रायफल, एक अत्याधुनिक पिस्तूल, जिवंत दारूगोळा आणि मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी साहित्य जप्त केले. चकमकस्थळी शोधमोहीम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या अभियानामुळे नक्षलवादी गडचिरोलीच्या सीमाभागात सक्रिय झाले आहेत. गडचिरोली पोलिसांना गट्टा दलमचे काही नक्षलवादी दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी ‘सी-६०’चे पथक अहेरीहून रवाना केले. दरम्यान, गट्टा जांबिया पोलीस आणि सीआरपीएफ १९१ बटालियनच्या ई कंपनीने जंगल परिसराला वेढा घातला. यावेळी जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला.

यानंतर पोलिसांनीही नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला तत्काळ प्रत्युत्तर दिले. यावेळी पोलिसांचा दबाव वाढल्यानंतर नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला. त्यानंतर जवानांनी परिसराची झडती घेतली असता दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. अद्यापही मोडस्के जंगल परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

१२ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण

नारायणपूर : छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात बुधवारी १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यापैकी नऊ जणांवर एकूण १८ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये पाच महिलांचा समावेश असून त्यांनी ज्येष्ठ पोलीस अधिकारी आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. नक्षलवादी विचारसरणीचा उबग आल्याने आत्मसमर्पण करीत असल्याचे या नक्षलवाद्यांनी म्हटले आहे.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण

GDP अंदाजात ४० आधार अंकांनी वाढ; भारताच्या आर्थिक वर्ष २६ साठी ‘OECD’चे भाकीत