महाराष्ट्र

Uddhav Thackeray : नागपुरात येताच उद्धव ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; नेमकं काय म्हणाले?

प्रतिनिधी

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे नागपूरमध्ये दाखल झाले. यानंतर त्यांनी आज सकाळी महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीमध्ये सहभाग घेतला. आज झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमधील एनआयटी भूखंड प्रकरणावरून प्रचंड गदारोळ झाला. तर, विरोधकांनी सभात्यागदेखील केला. यावरून उद्धव ठाकरे यांनीदेखील भूमिका मांडली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, "चोरी कोणीही केली, तरी ती चोरीच असते. या आरोपांनंतरही मुख्यमंत्री पदावर कायम आहेत. त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेत होऊ शकतो." अशी टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, "नागपूर न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश हा गंभीर आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे हा जुना विषय इतका सोपा असेल तर इतकी वर्ष न्यायालयात का होता? स्थगिती का देण्यात आली आहे?" असा सवाल त्यांनी केला. पुढे ते म्हणाले की, "स्थगिती देताना न्यायप्रविष्ट विषय असताना सरकारने यामध्ये हस्तक्षेप केल्याचे सांगितले. याला आमचा विरोध आहे, कारण ज्या खात्याचा निर्णय आहे त्या खात्याचे मंत्री आता मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सरकारकडून बाजू मांडली जाणार असेल तर त्यामध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही."

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, "ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण वेगळे असते. काही ठिकाणी स्थानिक आघाड्या असतात, तर काही ठिकाणी गावकरी एकत्र येऊन निवडणुका लढवतात. त्यामुळे हे कोणत्याही एका पक्षाचे यश, अपयश नाही. या निवडणुकांमध्ये पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक असे काही नसते. आपला पक्ष पहिला, तुमचा पक्ष दुसरा असे म्हणणे बालिशपणा आहे,”

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस