संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संभाजीनगर दौऱ्यावर

मराठा आंदोलन आणि गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा या पार्श्वभूमीवर रविवारी पोलीस विभागाकडून रंगीत तालीम घेण्यात आली. याशिवाय मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरही शहरभर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलन आणि गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा या पार्श्वभूमीवर रविवारी पोलीस विभागाकडून रंगीत तालीम घेण्यात आली. याशिवाय मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरही शहरभर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला.

शहरातील रस्त्यांवर इतर दिवसांच्या तुलनेत रविवारी वाहनांची वर्दळ कमीच असते. वाहनांची वर्दळ कमी असताना रविवारी मात्र काही चौकात वाहतूक विभागासह पोलीस कर्मचाऱ्यांची मराठा आरक्षण आंदोलनामुळे उपस्थिती होती. याशिवाय क्रांतीचौक आणि एमजीएम येथे पोलिसांची रंगीत तालीम झाली. इतर महत्त्वाच्या चौकांमध्ये शहरभर बंदोबस्त पोलिसांची मोठी उपस्थिती होती. संवेदनशील भागांवर पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले असून त्या ठिकाणी देखील मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे २४ सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी शहरात येणार आहेत.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी