कराड : बनावट नोटा प्रकरणी उरुलच्या आरोपी सरपंचाचा राजीनामा 
महाराष्ट्र

कराड : बनावट नोटा प्रकरणी उरुलच्या आरोपी सरपंचाचा राजीनामा

पाटण तालुक्यातील मल्हारपेठ परिसरात बनावट नोटा चलनात चालवून लोकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेला उरुल (ता. पाटण) गावाचा सरपंच नितीन जलदेव निकम याने अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला असून सदर राजीनामा पत्र ग्रामपंचायतीने सातारा जिल्हाधिकारी, पाटण तहसीलदार व पाटण पंचायत समितीचे गटविकास अधिकार्यांच्याकडे पाठविले आहे.

Swapnil S

कराड : पाटण तालुक्यातील मल्हारपेठ परिसरात बनावट नोटाचलनात चालवून लोकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेला उरुल (ता. पाटण) गावाचा सरपंच नितीन जलदेव निकम याने अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला असून सदर राजीनामा पत्र ग्रामपंचायतीने सातारा जिल्हाधिकारी, पाटण तहसीलदार व पाटण पंचायत समितीचे गटविकास अधिकार्यांच्याकडे पाठविले आहे.

उरुल ग्रामपंचायतीने याबाबत माहिती देताना सांगितले की, सरपंच नितीन जलदेव निकम याचा राजीनामा १ जुलै २०२६ पंचायत समितीकडे पाठवला. यानंतर उरुल ग्रामपंचायतीची विशेष मासिक सभा १४ जुलै रोजी पार पडून या सभेत सरपंचाने दिलेल्या राजीनाम्याचे वाचन करण्यात आले. उरुल ग्रामपंचायतीने सदर राजीनामा पत्र सातारा जिल्हाधिकारी यांना गेल्या १५ जुलै रोजी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सतीश श्रीरंग निकम व ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी विशाल मोहिते यांनी संयुक्त स्वाक्षरीने पाठविले आले.सदर राजीनामा पत्रासोबत मासिक सभा ठरावाची नक्कल प्रत,राजीनामा अर्जाची मूळ प्रत,पद रिक्त माहिती पत्र सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), पाटण तहसीलदार, पाटण पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

तिघांवर गुन्हे दाखल

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी उरुल सरपंच नितीन निकम, राजेंद्र थोरात तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अन्य तिघांवर मल्हारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे सरपंचालाच अटक होण्याची नामुष्की आली होती.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली