संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

भाजपने जे पेरले तेच उगवले! वैभव नाईक यांचा टोला

कधीकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विचारांचे कार्यकर्ते होते. मात्र भाजपने पैशांचे आमिष दाखवून कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवले आणि पक्ष वाढवला. आता त्याच कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षाकडून अधिक आमिषे दाखवली जात आहेत, त्यामुळे जे भाजपने पेरले, तेच आता उगवत आहे, अशी खरमरीत टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

Swapnil S

सिंधुदुर्ग : कधीकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विचारांचे कार्यकर्ते होते. मात्र भाजपने पैशांचे आमिष दाखवून कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवले आणि पक्ष वाढवला. आता त्याच कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षाकडून अधिक आमिषे दाखवली जात आहेत, त्यामुळे जे भाजपने पेरले, तेच आता उगवत आहे, अशी खरमरीत टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

सध्या भाजप व शिंदे शिवसेना यांच्यात फोडाफोडीच्या राजकारणावरून रंगलेली जुंप आणि कार्यकर्त्यांचे सुरू असलेले पक्षांतर यावर प्रतिक्रिया देताना नाईक बोलत होते. भाजपचे खरे नेतृत्व प्रभाकर सावंत किंवा रवींद्र चव्हाण करत नाहीत, तर ते राणे कुटुंबच करत आहे, हे पुन्हा सिद्ध झाले आहे, असा स्पष्ट टोला त्यांनी लगावला. सत्ता बदलली की राणे कुठे जातील, तिथे त्यांचे कार्यकर्ते जातील.

भाजपमध्ये शेवटी मोजके कार्यकर्तेच उरतील, असा दावा त्यांनी केला. अजूनही वेळ गेलेली नाही, असे सांगत नाईक यांनी भाजपला मतदारांचे प्रश्न सोडवा, जनतेची कामे करा आणि विचाराधारित कार्यकर्ते घडवा, असा सल्लाही दिला.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’