ठाकरे गट आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक 
महाराष्ट्र

ठाकरे गट आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक

विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित केलेल्या चर्चेच्यावेळी विधानसभेत शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आणि भाजपच्या अतुल भातखळकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.

Swapnil S

मुंबई : विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित केलेल्या चर्चेच्यावेळी विधानसभेत शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आणि भाजपच्या अतुल भातखळकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.

जाधव यांना विरोधी पक्षनेते व्हायची आस लागली आहे, असा टोला भातखळकर यांनी लगावल्यानंतर राम मंदिरात चोरी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असा प्रतिटोला आदित्य ठाकरे आणि जाधव यांनी भातखळकरांना लगावला. तालिकाध्यक्षांनी यात हस्तक्षेप करत वादावर पडदा टाकला. जाधव यांनी राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा मुद्दा उपस्थित केला.

जाधव यांनी या चर्चेला उत्तर कोण देणार? अशी विचारणा केली. तेव्हा सभागृहात उपस्थित असलेल्या राज्यमंत्री आशिष जयसवाल यांनी आपण उत्तर देणार असल्याचे सांगितले. सभागृहात महसूल मंत्री, मदत आणि पुनर्वसन मंत्री, दोन उपमुख्यमंत्री असताना राज्यमंत्र्यांकडून उत्तर मिळणार असेल तर चर्चा कशाला करायची? सरकार गंभीर आहे का? अशा शब्दात भास्कर जाधव यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

अतुल भातखळकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. ज्या विषयावर चर्चा सुरू आहे. अशा वेळी ज्यांना विरोधी पक्षनेते व्हायची आस लागली आहे, त्यांना या मदत आणि पुनर्वसन मंत्री कोण आहेत हे माहीत नाही का? असा सवाल भातखळकर यांनी केला.

नैसर्गिक संकटात काय केले?

पावसाने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, पण त्या दूर करण्यासाठी आपली यंत्रणा सक्षम नाही. नैसर्गिक संकटाची पूर्वकल्पना मिळाली होती तर राज्यकर्ते म्हणून आपण काय केले? केवळ संकट येणार असे सांगून सरकारची जबाबदारी संपली का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड