धार्मिक उत्सवांसाठी मोठी मैदाने आरक्षित ठेवा! विद्यानंद बापट यांची राज्य सरकारकडे मागणी संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

धार्मिक उत्सवांसाठी मोठी मैदाने आरक्षित ठेवा! विद्यानंद बापट यांची राज्य सरकारकडे मागणी

धर्म आणि धार्मिक उत्सव हे घरापुरतेच मर्यादित ठेवा, ते रस्त्यावर आणू नये, याची काळजी सर्व धर्मीयांनी घ्यावी. धार्मिक उत्सव साजरे करण्यासाठी मोठी मैदाने राज्य सरकारने आरक्षित ठेवावीत, नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची सरकारने जबाबदारी घ्यावी, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी केले.

Swapnil S

मुंबई : धर्म आणि धार्मिक उत्सव हे घरापुरतेच मर्यादित ठेवा, ते रस्त्यावर आणू नये, याची काळजी सर्व धर्मीयांनी घ्यावी. धार्मिक उत्सव साजरे करण्यासाठी मोठी मैदाने राज्य सरकारने आरक्षित ठेवावीत, नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची सरकारने जबाबदारी घ्यावी, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी केले.

महात्मा जोतिबा फुले यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त आणि सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वाटचालीच्या पार्श्वभूमीवर भायखळा येथील शाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात दैनिक शिवनेरच्या वतीने सत्यशोधक महोत्सव आयोजित केला होता. यावेळी विद्यानंद बापट बोलत होते. यावेळी 'दोनशे वर्षांचे महात्मा फुले' या विषयावर अ‍ॅड. शंकर निकम यांनी प्रभावी विवेचन केले. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी परिसंवादात आपले विचार मांडले. समारंभाचे आयोजक नरेंद्र वाबळे यांनी प्रास्ताविक केले. महात्मा जाेतिबा फुले यांचा भव्य द्विजन्मशताब्दी  सोहळा साजरा करण्याचा संकल्प त्यांनी सोडला. यावेळी रवींद्र आवटी, उद्योजक प्रकाश चिखलीकर, किरणशेठ झोडगे, विजय तांबे, चंद्रकांत खोपडे, विजय झांजुरे उपस्थित होते. महोत्सवाची सांगता 'लोकशास्त्र सावित्री' नाटकाच्या प्रयोगाने करण्यात आली.

बापट म्हणाले, मुंबई आणि पुण्यातील गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी, ढोल, ताशा यांच्या दणदणाटाने नागरिकांना त्रास झाला. धार्मिक उत्सव रस्त्यावर येता कामा नये, त्यासाठी राज्य सरकारनेच पुढाकार घ्यावा. मोकळ्या मैदानावर धार्मिक उत्सव साजरे करावे. जेणेकरून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होणार नाही आणि उत्सवही साजरे होतील.

फक्त हिंदू धर्मावरच टीका का?

धार्मिक उत्सव रस्त्यावर आणावे का, या विषयावर भाजपचे ज्येष्ठ नेते मधु चव्हाण म्हणाले की, माणूस हा समूहाने जगणारा प्राणी आहे. सर्व धर्माचे लोक सण आणि उत्सव साजरे करतात; मात्र, फक्त हिंदू धर्मावरच टीका का केली जाते,  असा सवालदेखील चव्हाण यांनी केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra MLC Election 2026 : विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी मतमोजणी सुरू; महायुती की मविआ, कोण मारणार बाजी?

मीरा-भाईंदरमध्ये पाण्यासाठी हाहाकार; MIDC कडून १५ टक्के पाणी कपात

ब्रेडमध्ये केवळ ६२ टक्के गव्हाचा वापर; CCPA चा ब्रिटानियाला लाखाचा दंड

तानसा, कोलामार्काला राखीव अभयारण्याचा दर्जा; १४ संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित करण्यास वन्य जीव मंडळाची मान्यता

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या कनेक्टिंग लिंकवर मालवाहू वाहनांना बंदी; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी