विजय वडेट्टीवार  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

पाकचे १५ हजाराचे ड्रोन १५ लाखांच्या क्षेपणास्त्राने पाडले; विजय वडेट्टीवार यांची टीका

पाकने भारतावर चिनी बनावटीच्या ५ हजार ड्रोनद्वारे हल्ला केला. त्यांच्या एका ड्रोनची किंमत १५ हजारांच्या आसपास आहे. हे एक ड्रोन पाडण्यासाठी आपण...

Swapnil S

चंद्रपूर : पाकने भारतावर चिनी बनावटीच्या ५ हजार ड्रोनद्वारे हल्ला केला. त्यांच्या एका ड्रोनची किंमत १५ हजारांच्या आसपास आहे. हे एक ड्रोन पाडण्यासाठी आपण १५ लाख रुपयांचे क्षेपणास्त्र डागले. आत्ता यामागे चीनचे डावपेच असल्याचा दावा केला जात आहे. मला वस्तुस्थिती माहिती नाही. पाकने आपली ४ राफेल विमाने पाडल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे सरकारने याप्रकरणी स्थिती स्पष्ट करण्याची गरज आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

काँग्रेसने बुधवारी सद्भावना दिनानिमित्त चंद्रपूर येथे तिरंगा रॅली काढली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी काही सवाल उपस्थित केले. पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेले २५० किलो आरडीएक्स कुठून आले याचा शोध लागला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

लोकशाहीत जनतेला व विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. राहुल गांधी यांनी प्रश्न विचारताच सरकार ते सैन्याचा अपमान असल्याचा आरोप करते, अशी टीका त्यांनी केली.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता