महाराष्ट्र

माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या सहकाऱ्याचा मृत्यू; विश्वास नांगरे पाटील यांची भावूक पोस्ट

गरड यांचं ब्रेन डेड झाल्यानंतर त्यांना काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

नवशक्ती Web Desk

जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट यशस्वीपणे सर करणारे पुणे पोलीस दलातील कर्मचारी स्वप्निल गरड यांचा मृत्यू झाला आहे. गरड यांनी माऊंट एव्हरेस्ट शिखर यशस्वीरित्या सर केलं, त्यानंतर त्यांची प्रकृती बघडली होती. गरड यांचं ब्रेन डेड झाल्यानंतर त्यांना काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सध्याकाळी चार वाजेच्या सुमारास गरड यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. आयपीएस आधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे.

विश्वास नांगरे पाटील यांनी 'गड आला पण सिंह गेला' असं म्हटलं आहे. तसंच स्वप्निल गरड यांच्या विषयी लिहताना ते म्हणात की, पुणे पोलीस दलात कार्यरत असणारे हेड कॉन्स्टेबल स्वप्निल गरड यांनी जिद्द आणि धैर्याने एव्हरेस्ट शिखर सर केलं. दुर्दैवानं शिखराव गेल्यानंतर त्यांना हाय अल्टिट्यूड सेरेब्रल ओडेमा (HECO) मुळे खूप त्रास झाला आणि काठमांडू येथील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. असं ते म्हणाले आहेत. तसंच स्वप्निल अतिशय प्रामाणिक पोलीस कर्मचारी होता, तितकाच तो नम्र आणि भारी माणूस होता. तसंच तो महान गिर्यारोहकही होता. असं देखील नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे.

स्वप्निल गरड यांच्याविषयी नांगरे पाटील पुढे म्हणतात की, मला त्याच्या डोळ्यातील आकांक्षा आणि स्वप्ने मोठी उंची गाठण्यासाठी स्पष्टपणे आठवतात. त्याच्या आत्म्याला शांती लाभो. हा असह्य धक्का आणि हानी सहन करण्याची ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो. आम्हा पोलिसांना तुझा अभिमान आहे. स्वप्निल तुझ नाव या महान दलातील शूर योद्ध्यांच्या यादीत कोरलं गेलं आहे. असं ते म्हणाले आहेत. आपल्या पोलीस दलातील एक कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी गेल्यानं विश्वास नांगरे पाटील यांनी ही भावूक पोस्ट शेअर केली आहे.

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

NATO ची भारत, चीन, ब्राझीलला धमकी; रशियाशी व्यापार थांबवा, अन्यथा १०० टक्के टॅरिफ

फडणवीस-शिंदे-ठाकरेंमध्ये रंगली जुगलबंदी; आमच्यासोबत सत्तेत या! मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना सभागृहातच थेट ऑफर

राज ठाकरे यांचे ‘तळ्यात-मळ्यात’; युतीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही!

जनसुरक्षावरून काँग्रेस आमदारांनी घेतलेल्या भूमिकेवर पक्षश्रेष्ठी नाराज; विधिमंडळ पक्षाला स्पष्टीकरणाचे आदेश