प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

लग्नाळूसाठी यंदा 'गुड न्यूज'! नोव्हेंबरपासून जून अखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त; लग्नसराईशी संबंधित व्यावसायिकांसाठी सुगीचे दिवस

लग्नसराईच्या सिझनमध्ये मंडप डेकोरेशन, कपडे, सराफ बाजार, मंगल कार्यालय, भांडी दुकानांसह संबंधित घटकांतील अनेक व्यापाऱ्यांना तीन वर्षांच्या तुलनेपेक्षा यंदा जादा उत्पन्न मिळण्याची आशा आहे.

Swapnil S

ठाणे : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त आहेत.

वैदिक परंपरेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी (देवशयनी) ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मास पाळला जातो. यावर्षी भागवत एकादशी २ नोव्हेंबरला आहे. द्वादशीला श्रीकृष्ण यांच्याशी तुळशीचा विवाह लावण्यात येतो. तेव्हापासून वैवाहिक मुहूर्त काढले जाण्याची परंपरा आहे.

लग्नसराईच्या सिझनमध्ये मंडप डेकोरेशन, कपडे, सराफ बाजार, मंगल कार्यालय, भांडी दुकानांसह संबंधित घटकांतील अनेक व्यापाऱ्यांना तीन वर्षांच्या तुलनेपेक्षा यंदा जादा उत्पन्न मिळण्याची आशा आहे. यावर्षी तुळशीचा विवाह कार्तिक शुक्ल द्वादशी बुधवार, २ नोव्हेंबरपासून, कार्तिक पौर्णिमा शुक्रवार, ५ नोव्हेंबरपर्यंत करावयाचा आहे. त्यानंतर माणसांच्या विवाह सोहळ्यांना प्रारंभ होईल.

डिसेंबर २०२५ मध्ये लग्नासाठी ४, ५ आणि ६ डिसेंबर या तीन शुभ तारखा आहेत. जानेवारी २०२६ या महिन्यात शुक्र ग्रहाच्या दहनामुळे आणि इतर प्रतिकूल घटकांमुळे लग्नासाठी शुभ मुहूर्त नाही. त्यामुळे, लग्न करण्यासाठी हा काळ शुभ नाही. फेब्रुवारी २०२६ मध्ये ५, ६, ८, १०, १२, १४, १९, २०, २१, २४, २५ आणि २६ या दिवशी विवाह मुहूर्त आहेत.

मार्च हा एक संक्रमणकालीन महिना म्हणून ओळखला जातो, जो उबदार वसंत ऋतूचे स्वागत करतो आणि हिवाळ्याला निरोप देतो. मार्च २०२६ मध्ये २, ३, ४, ७, ८, ११, १२ रोजी विवाह मुहूर्त आहेत. एप्रिल हा फुलांचा महिना, जेव्हा वसंत ऋतू त्याच्या शिखरावर असतो. या महिन्यात १५, २०, २१, २५, २७, २८ आणि २९ तारखेला विवाह मुहूर्त आहेत.

मे २०२६ मध्ये हिंदू पंचांगामध्ये लग्नासाठी ८ शुभ मुहूर्त आहेत. त्यात १, ३, ५, ६, ७, ८, १३ आणि १४ मे २०२६ या तारखांचा समावेश आहे. जून २०२६ महिन्यात उन्हाळ्याचे लांब दिवस, तेजस्वी सूर्यकिरणांसह आपले आत्मे शुद्ध करतात. या महिन्यात २१, २२, २३, २४, २५, २६, २७ आणि २९ जून २०२६ या ८ तारखांना लग्नाचे मुहूर्त असल्याचे हिंदू पंचांगामध्ये नोंद आहे.

‘मनरेगावर बुलडोझर’; नाव बदलावरून सोनिया गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय; महाविकास आघाडीत फूट

"निवडणुक आयोगाने थेट बोली लावूनच..."; नगरपरिषद निवडणुकांवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू

Thane : ठाणेकरांना मिळणार काशीचा अनुभव; नववर्षाच्या पूर्वसंध्येला तलावपाळीवर गंगा आरतीचे आयोजन