महाराष्ट्र

राज्यातल्या धरणातील पाणीसाठा खालावला ; टँकरच्या संख्येतही वाढ

नवशक्ती Web Desk

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्मा मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागांत सूर्यदेव कोपला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा खालावत असून, सोमवारच्या आकडेवारीनुसार राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा केवळ ३५.१९ टक्क्यांवर आला आहे. टँकरच्या मागणीतही दिवसेंदिवस वाढ होत असून, राज्यातील ३३४ गावे आणि ७७४ वाड्यांना सध्या २४५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो आहे.

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर उष्णतेची लाट आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. परिणामी टँकरची संख्याही वाढली आहे. राज्यातल्या सुमारे १ हजार १०८ वाड्या-वस्त्यांना सध्या २४५ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यामध्ये कोकण विभागातील टँकरची संख्या अधिक आहे. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील ६६३ वाड्या-वस्त्यांना ११८ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मागील आठवड्यात २१३ टँकरने पाणीपुरवठा होत होता, तर गेल्या वर्षी याच काळात ३५५ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या एकही टँकर वापरात नाही. सिंधुदुर्गातील तिलारी धरणातील पाणीसाठा सध्या ३५.१९ टक्क्यांवर आला आहे.

राज्यात सध्या २४५ टँकरने पाणीपुरवठा

ठाणे- ३९, रायगड-३४, रत्नागिरी- ११, पालघर- ३४

नाशिक- ३१, जळगाव- १६, पुणे- २२

राज्यातील सर्वाधिक उष्णतेचे जिल्हे व अवर्षणग्रस्त जिल्हे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशीव, बीड, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये विशेष म्हणजे एकाही वाड्या-वस्त्यांना अद्याप तरी टँकरने पाणीपुरवठा होत नाही.

राज्यातल्या धरणातील पाणीसाठा- ३५.१९ टक्के

मध्य वैतरणा- १३. ८८ टक्के

भातसा, ३७ टक्के

मोडकसागर- ४७. ९५ टक्के

तानसा- ४२ टक्के

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल