व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट एक्स/पीटीआय
महाराष्ट्र

पुण्यात पाण्याची टाकी कोसळली; ५ कामगारांचा मृत्यू

हे कामगार पाण्याच्या टाकीखाली आंघोळ करत असताना ही दुर्घटना घडली.

Swapnil S

पुणे : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये भोसरी भागातील कामगार वसाहतीत गुरूवारी सकाळी पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत ५ कामगारांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे कामगार पाण्याच्या टाकीखाली आंघोळ करत असताना ही दुर्घटना घडली. पाण्याचा दाब वाढल्याने ती फुटून हा अपघात झाला, असे पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी सांगितले. या दुर्घटनेत तीन कामगार जागीच, तर दोघे रुग्णालयात मरण पावले, तर पाच कामगारांवर उपचार सुरू आहेत.

डिसेंबरपर्यंत उन्हाचे चटके बसणार! एल निनोची तीव्रता वाढणार, सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार

ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी

ज्ञानेशांविरोधात 'गर्जना'; सर्वपक्षीय मोर्च्यात राज्यातील SIR रद्द करण्याची मागणी

नागरिकांचे मत काढून घेणारी प्रक्रिया मनमानी; सर्वोच्च न्यायालयाचे न्या. उज्ज्वल भुयान यांची चपराक

GST अधिकाऱ्यांवर आता लागणार लगाम; जीएसटी अंमलबजावणीत व्यापक सुधारणा होणार