एक्स @CMOMaharashtra
महाराष्ट्र

आपण नवा बीड तयार करू - मुख्यमंत्री; आष्टीत एकाच व्यासपीठावर पंकजा मुंडे, सुरेश धस आणि फडणवीसांची टोलेबाजी

राज्यभर गाजत असलेल्या बीडमध्ये बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार सुरेश धस व मंत्री पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले.

Swapnil S

आष्टी : राज्यभर गाजत असलेल्या बीडमध्ये बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार सुरेश धस व मंत्री पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले. यावेळी सर्व नेत्यांनी जोरदार टोलेबाजी करीत एकमेकांना बाहुबली, भगीरथ आणि शिवगामिनीची उपमा दिली. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात सगळ्यांवर कारवाई होणार, या ठिकाणी सगळ्यांना गुण्या गोविंदाने राहायचे आहे, त्यामुळे आपण नवीन बीड तयार करू, असे देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले.

बीडच्या आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलाव योजना प्रकल्पातील बोगद्याचे भूमिपूजन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार सुरेश धस आणि मंत्री पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित नेत्यांनी एकमेकांना चिमटे काढीत जोरदार टोलेबाजी केल्याने हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला.

पंकजा शिवगामिनी

धस आपल्याला शिवगामिनी म्हणतात, असे यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या आणि त्यांनी लोकसभा निवडणुकीवरून धस यांना अप्रत्यक्षपणे टोलाही लगावला. सुरेश अण्णा... मी अजूनही तुम्हाला अण्णा म्हणते, पण तुम्ही मला ताईसाहेब म्हणत नाहीत. आमच्याकडून तरी नाते अजूनही तसेच आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा उल्लेख करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझा पराभव करून जे बीड जिल्ह्याचे खासदार झाले आहेत ते बजरंग बाप्पा. पंकजा यांनी केलेल्या या उल्लेखानंतर कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाकडून जोरदार प्रतिसाद आला आणि टाळ्या आणि शिट्ट्या वाजू लागल्या. त्यानंतर धस यांच्या नावाचा उल्लेख करताना पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांचे लक्ष वेधत म्हटले की, "मुख्यमंत्री साहेब बघा... राष्ट्रवादीच्या खासदारासाठीही भाजप आमदारांच्या, कार्यकर्त्यांच्या टाळ्या जास्त वाजत आहेत.

देवेंद्र बाहुबली

आमदार सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली असा केला. धस यांच्याकडून भरसभेत फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. बाकी कोणाकडून अपेक्षा नाही, पण फडणवीसांकडून अपेक्षा आहे, असे धस म्हणाले.

धस आधुनिक भगीरथ

फडणवीस यांनीही धस यांचे कौतुक करताना त्यांचा आधुनिक भगीरथ असा उल्लेख केला. फडणवीस सुरेश धस यांच्याबाबत म्हणाले, सुरेश धस हे आधुनिक भगीरथ आहेत, ते एकदा मागे लागले तर डोके खाऊन टाकतात. महायुतीचे सरकार असताना त्यांनी मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मेहनत घेतली. आता या तलावामुळे दुष्काळी आष्टी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

लहान समाजात जन्मलो हे पाप आहे का?भुजबळांचा उद्विग्न सवाल; लातूरच्या कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट, मुंडेही उपस्थित

नेपाळ : आंदोलकांनी आग लावलेल्या हॉटेलमधून पळण्याच्या प्रयत्नात भारतीय महिलेचा मृत्यू

तुम्हाला खुल्या प्रवर्गातील आरक्षण नकोय का? छगन भुजबळ यांचा मराठा नेते, शिक्षित समाजाला सवाल

Mumbai : उद्यापासून एलफिन्स्टन पूल बंद; दक्षिण मुंबईत होणार वाहतूककोंडी; अनेक मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल

Ulhasnagar : सेंच्युरी कंपनीच्या कँटीनमध्ये बनावट कूपन घोटाळा उघडकीस; प्रिंटिंग प्रेसवर पोलिसांची कारवाई