प्रातिनिधिक फोटो
महाराष्ट्र

MSBSHSE 12th Result 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर, जाणून घ्या सविस्तर माहिती

Tejashree Gaikwad

Maharashtra Board 12th Result Date and Time: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) २१ मे रोजी दुपारी १ वाजता बारावी बोर्डाचा निकाल जाहीर करेल. वेगवगेळ्या तारखांच्या अफवानंतर अखेरीस खरी तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी, महाराष्ट्र मंडळातर्फे २ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत इयत्ता १२वीच्या बोर्डाच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. बोर्डाच्या परीक्षेत सहभागी झालेले विद्यार्थी निकाल लागण्याची वाट पाहत आहेत. अखेरीस २१ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

कसा बघता येईल निकाल?

महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल २०२४ पाहण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in ला भेट द्या.

वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला निकाल बघण्यासाठीची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला रोल नंबर आणि आईचे नाव टाका.

निकाल पहा असं लिहलेल्या बटणावर क्लिक करा.

यानंतर, तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. या मार्कशीटची प्रत तुम्ही तिथून डाउनलोड करू शकाल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या डेटानुसार, यावर्षी राज्यात एकूण १५,१३,९०९ उमेदवारांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात ८,२१,४५० मुले आणि ६,९२,४२४ मुलींचा समावेश आहे. ७,६०,०४६ विज्ञान शाखेत बारावीच्या परीक्षेसाठी सर्वाधिक उमेदवारांची नोंदणी झाली होती, त्यापाठोपाठ कला शाखेतील ३,८१,९८२ विद्यार्थी आणि वाणिज्य शाखेतील ३,२९,९०५ उमेदवार आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्र बारावीच्या परीक्षेत, कोकण जिल्ह्यात सर्वाधिक उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.०१ टक्के होते.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त