महाराष्ट्र

फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी कधी? फेरीवाला संघटना आक्रमक; २७ फेब्रुवारीला हजारो फेरीवाले वर्षावर धडकणार

Swapnil S

मुंबई : फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात चालढकल सुरू असून, राज्य सरकारच्या या भूमिकेविरोधात फेरीवाला संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्य सरकारने यात जातीने लक्ष घालत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी, यासाठी २७ फेब्रुवारी रोजी वर्षावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा महाराष्ट्र हॉकर फेडरेशन संलग्न नॅशनल हॉकर फेडरेशनने दिला आहे.

फेरीवाल्यांचा व्यवसाय वाढावा, यासाठी २०१४ साली करण्यात आलेल्या कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने फेरीवाल्यांना नीट व्यवसाय करता येत नाही. पालिका, पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो. फेरीवाल्यांवर सातत्याने होणाऱ्या कारवाईमुळे त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते आहे. आजही राज्यात फेरीवाला कायदा अंमलबजावणी करण्यासाठी योजना बनवलेली नाही. त्यामुळे सर्व्हेमध्ये आढळलेल्या पथ विक्रेत्यांना अद्याप प्रमाणपत्र देऊन संरक्षण मिळालेले नाही. फेरीवाल्यासाठी कायदा असूनही त्याचे मूलभूत अधिकार डावलले जात आहेत. फेरीवाल्याच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने फेरीवाले आक्रमक झाले आहेत. फेरीवाल्यांच्या सर्व संघटना एकत्र येऊन सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय फेरीवाल्यांनी घेतला आहे.

२७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ग्रँट रोड येथील ऑगस्ट क्रांती मैदान येथून लाँग मार्च करीत वर्षावर धडक दिली जाणार आहे. सर्व फेरीवाल्यांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नॅशनल हॉकर फेडरेशनने केले आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल