महाराष्ट्र

‘शिवाजी कोण होता? हे पुस्तक लिहिल्यानेच पानसरेंची हत्या; कुटुंबीयांचा दावा

गेली नऊ वर्षे सीआयडी या प्रकरणी तपास करत होती. पण, तपास योग्य दिशेने होत नव्हता.

Swapnil S

मुंबई : शिवाजी कोण होता? हे पुस्तक लिहिल्यानेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी मुंबई हायकोर्टात केला आहे. पानसरे यांची २०१५ मध्ये भरदिवसा गोळ्या घालून हत्या झाली होती. या हत्येचा सूत्रधार कोण? हत्येमागचे नेमके कारण काय? हत्या कोणी केली? याबाबत अद्याप काहीही पत्ता लागलेला नाही. गेली नऊ वर्षे सीआयडी या प्रकरणी तपास करत होती. पण, तपास योग्य दिशेने होत नव्हता. त्यानंतर हा तपास हायकोर्टाने एटीएसकडे सोपवला. मात्र, दहशतवादविरोधी पथकाकडूनही याप्रकरणी प्रगती होत नसल्याचे दिसत आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश, डॉ. नरेंद्र दाभोलकर ही सर्व प्रकरणे एकमेकांशी जोडली गेलेली आहेत. इतर प्रकरणात तपास पुढे जात आहे. पण, कॉम्रेड पानसरे यांच्या प्रकरणात काहीही हाती लागत नाही. त्यामुळे हायकोर्टाने एटीएसला आपला अहवाल चार आठवड्यात सादर करण्यास सांगितले आहे. गुरुवारच्या सुनावणीत पानसरे कुटुंबीयांनी ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक लिहिल्यामुळेच त्यांच्यावर गोळी झाडण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी इतर काही पुरावे कोर्टासमोर सादर केले आहेत. जवळपास नऊ वर्ष होऊनची मारेकरी मोकाट का? असा उद्विग्न सवाल पानसरेंच्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, कोल्हापूर येथे राहत्या घरात त्यांच्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा! १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समितीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान

मतदार यादीत नाव सापडत नाहीये? BMC ने हेल्पलाईन क्रमांक केला जारी

Mumbai : ५ कोटींच्या खंडणीसाठी RTI कार्यकर्त्याची आंध्रच्या खासदाराला धमकी; पीएला चाकू दाखवत ७० हजारही लुटले, मुंबईतून अटक

'२५ वर्षे झाली, मला सोडा'; अबू सालेमच्या मागणीवर SC चा सवाल- २००५ पासून गणना कशी केली? नियमांबाबत स्पष्टीकरणही मागवले

KDMC Election : पुणेरी पाटी टाईप संदेशाने सर्वांचीच करमणूक; अख्ख्या बिल्डिंगचे मत केवळ यांनाच