मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  संग्रहित फोटो
महाराष्ट्र

शिवसैनिक असताना शत्रूची पर्वा का करू? उद्धव ठाकरेंचा महायुतीवर ‘मार्मिक’ हल्ला, नियतकालिकाच्या ६४ व्या वर्धापनदिनी आठवणींना उजाळा

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे / मुंबई

ज्यांना आपले समजले त्यांनीच गद्दारी केली. तरी शिवसेना आजही दिमाखात उभी आहे. माझ्या सोबत माझे शिवसैनिक आहे, तेव्हा मी शत्रूची पर्वा का करू असा टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीला लगावला.

दादर (पश्चिम) येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर सभागृहात मार्मिकच्या ६४ व्या वर्धापनदिनी ते बोलत होते. गेल्या ६४ वर्षांतील मार्मिकच्या प्रवासातील आठवणींना उजाळा त्यांनी यावेळी दिला. शिवसेना नेते अनंत गीते, दिवाकर रावते, सुभाष देसाई आदी याप्रसंगी उपस्थित होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकची स्थापन केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब त्यावेळी म्हणायचे की, वय सगळ्यांचे वाढते पण माणूस मनाने थकतो तेव्हा वयस्कर होतो. मी शिवसेना प्रमुखाचा मुलगा आहे, त्यांच्याकडून धडे घेतले आहेत. त्यामुळे माझे कट्टर शिवसैनिक सोबत असल्याने मला शत्रूची पर्वा करण्याची गरज काय, असेही ते यावेळी म्हणाले.

ठाकरे म्हणाले की, मार्मिक हा चमत्कार आहे. एका व्यंगचित्रकाराने एका कुंचल्याच्या आधारावर ते उभे केले आहे. व्यंगचित्र बघता बघता मी लहानाचा मोठा झालो. मार्मिकची स्थापना १९६०ची आणि माझा जन्म एकाच वर्षातला. शिवसेनेची स्थापना माझ्यासमोर झाली. माझ्यासमोर नारळ फोडला गेला. त्याच्या शिंतोड्याने मी भिजून गेलो. हा वारसा आपण घेऊन जात आहे. तुम्ही संकटातही साथ देत आहात, तेव्हा मला कुणाची पर्वा नाही, असे ठाकरे म्हणाले.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा