मुंबई : महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत मिळणारी आर्थिक मदत येत्या १५ ऑगस्टला लाभार्थी महिलांच्या खात्यांत जमा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या योजनेंतर्गत मिळालेल्या अर्जांवरून १६ जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर १ ऑगस्टला या योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.
त्यानंतर १४ ऑगस्टला लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्यामुळे साधारणतः १५ ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळू शकेल. त्यानंतर दर महिन्याच्या १५ तारखेला महिलांच्या खात्यात १५०० रुपयांची रक्कम जमा करण्यात येईल, असे सांगितले जाते. ही योजना १ जुलैपासून लागू करण्यात आली असून, या योजनेचा राज्यातील ३.५० कोटी महिलांना लाभ होणार आहे.